मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : सुपर ओव्हरशी 36 चा आकडा, शांत केन विलियमसनही वैतागला

IPL 2021 : सुपर ओव्हरशी 36 चा आकडा, शांत केन विलियमसनही वैतागला

आयपीएलमध्ये (IPL 2021) सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या केन विलियमसनला (Kane Williamson) आणखी एका सुपर ओव्हरमध्ये निराशा आली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (DC vs SRH) सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला.

  • Published by:  Shreyas

चेन्नई, 26 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL 2021) सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या केन विलियमसनला (Kane Williamson) आणखी एका सुपर ओव्हरमध्ये निराशा आली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (DC vs SRH) सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. या दोन्ही टीममधली मॅच टाय झाल्यानंतर हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियमसन सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात उतरले, यानंतर त्यांना 7 रनच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने 6 बॉलमध्ये 8 रन करून केला.

केन विलियमसन आणि सुपर ओव्हरचा 36 चा आकडा आहे. 2019 पासून केन विलियमसनचा सुपर ओव्हरमधला हा पाचवा पराभव होता. यातल्या 3 मॅच आयपीएलच्या तर 2 आंतरराष्ट्रीय मॅच होत्या. याआधी 29 जानेवारी 2020 ला भारताविरुद्धच्या (India vs New Zealand) तिसऱ्या टी-20 मध्येही न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता. दोन्ही टीमनी 20 ओव्हरमध्ये 179-179 रन केले होते. केन विलियमसनने 95 रनची खेळी केली, पण तरीही किवींना यश आलं नाही. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 17 रन केल्यानंतर रोहित शर्माच्या दोन सिक्समुळे भारताचा विजय झाला. सुपर ओव्हरमधला हा न्यूझीलंडचा लागोपाठ 5 वा पराभव होता.

2019 नंतर न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 4 सामने गमावले, यातल्या दोन सामन्यांमध्ये केन विलियमसन होता. विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडची टीम 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये (ICC World Cup 2019) पोहोचली होती, पण इंग्लंडविरुद्धची ही मॅचही सुपर ओव्हरमध्ये गेली. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच सुपर ओव्हरही टाय झाली, अखेर वादग्रस्त बाऊंड्री काऊंटच्या नियमामुळे इंग्लंडला वनडे वर्ल्ड कप विजेता घोषित करण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय मॅचशिवाय आयपीएलमध्येही विलियमसनला सुपर ओव्हरने त्रास दिला आहे. रविवारी दिल्लीविरुद्धचा सामना गमावण्याआधी दोनवेळा विलियमसन असताना हैदराबादचा सुपर ओव्हरमध्येच पराभव झाला. 2020 सालच्या आयपीएलमध्ये कोलकाता आणि हैदराबादने 163-163 रन केले. न्यूझीलंडच्याच लॉकी फर्ग्युसनने सुपर ओव्हरमध्ये हैदराबादच्या दोन बॉलमध्ये दोन विकेट घेतल्या आणि केकेआरला जिंकवून दिलं.

2019 सालीही मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता. त्यावेळी वॉर्नरच्या गैरहजेरीत विलियमसन हैदराबादचा कर्णधार होता.

सुपर ओव्हरला विलियमसन वैतागला

सुपर ओव्हरमध्ये वारंवार होत असलेल्या पराभवामुळे केन विलियमसनही वैतागला आहे. सुपर ओव्हरमध्ये सारखा पराभव होत असल्यामुळे थकलो आहे, असं विलियमसन म्हणाला आहे. क्रिकेटमध्ये असं होतं, तेव्हा सामना टाय होतो, पण यामुळे खेळातला रोमांच वाढतो. या सामन्यातून आम्ही बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकलो आहे. नवा जोश घेऊन आम्ही दिल्लीला पोहोचू, असा विश्वास विलियमसनने व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, SRH