मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला उशीरा सुचलं शहाणपण, सर्वांनी फटकारल्यानंतर सुधारली मोठी चूक

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला उशीरा सुचलं शहाणपण, सर्वांनी फटकारल्यानंतर सुधारली मोठी चूक

आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) विजयानंतर दक्षिण आफ्रिकेत महाभारत रंगले होते.

आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) विजयानंतर दक्षिण आफ्रिकेत महाभारत रंगले होते.

आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) विजयानंतर दक्षिण आफ्रिकेत महाभारत रंगले होते.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) पराभव करत विजेतेपद पटकावले. सीएसकेच्या (CSK) या विजेतेपदानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये (Cricket South Africa) महाभारत रंगले होते. चेन्नईच्या विजयाचा फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. फाफने 86 रनची शानदार खेळी केली. या खेळीबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार देण्यात आला होता. सीएसके चॅम्पियन झाल्यानंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लुंगी एनगिडीचा (Lungi Ngidi) एक फोटो शेयर केला. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आयपीएल ट्रॉफी जिंकल्याबद्दल लुंगी एनगिडीचे अभिनंदन, असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली होती. क्रिकेट साऊथ आफ्रिकाच्या या पोस्टवरून मोठा वाद झाला, कारण लुंगी एनगिडी फायनलमध्ये सीएसकेच्या प्लेयिंग इलेव्हनमध्येही नव्हता. या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' असलेल्या आपल्याच देशाच्या फाफ डुप्लेसिसचा उल्लेख क्रिकेट साऊथ आफ्रिकाने टाळला होता. ही पोस्ट बघून खुद्द फाफ डुप्लेसिसही संतापला. खरंच क्रिकेट साऊथ आफ्रिका? अशी कमेंट फाफ डुप्लेसिसने या फोटोवर केली. डेल स्टेन (Dale Steyn) यानेही या पोस्टवर आक्षेप घेतले. 'हे अकाऊंट कोण चालवत आहे?  असा प्रश्न विचारला. अनेक क्रिकेट फॅन्सनी या विषयावर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला फटकारले. सर्व बाजूनी टीका झाल्यानंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकेनं ही पोस्ट डिलिट केली आणि अखेर नवं ट्विट करत चूक सुधारली आहे. T20 World Cup: पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव, Video Viral होताच आली जाग चेन्नई सुपर किंग्सच्या IPL 2021 मधील विजेतेपदामध्ये सहभागी असलेल्या सर्व दक्षिण आफ्रिकन्सचं अभिनंदन. आयपीएल फायनलमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावणाऱ्या फाफ डुप्लेसिसचं विशेष अभिनंदन, असं नवं ट्विट क्रिकेट साऊथ आफ्रिकेनं त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या फाफ डुप्लेसिसचा टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. आगामी वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची पहिली मॅच 23 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, South africa

    पुढील बातम्या