IPL 2021 सुरू होण्याआधीच घाबरल्या टीम, जाणून घ्या कारण

IPL 2021 सुरू होण्याआधीच घाबरल्या टीम, जाणून घ्या कारण

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या यंदाच्या मोसमाची सुरूवात एप्रिल महिन्यात होऊ शकते. स्पर्धेच्या वेळापत्रकाची अजून घोषणा झालेली नाही, पण यंदा 6 शहरांमध्ये मॅच होणार असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या यंदाच्या मोसमाची सुरूवात एप्रिल महिन्यात होऊ शकते. स्पर्धेच्या वेळापत्रकाची अजून घोषणा झालेली नाही, पण यंदा 6 शहरांमध्ये मॅच होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली, बँगलोर, अहमदाबाद आणि कोलकात्यामध्ये आयपीएल स्पर्धेचं आयोजन व्हायची शक्यता आहे. पण बीसीसीआयचा हा निर्णय काही फ्रॅन्चायजींना पसंत नाही.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार काही टीम मालकांच्या मते आयपीएलचं आयोजन दोन स्थानांवर आयोजित करणं जास्त चांगलं होतं. मागच्या मोसमात तर फक्त तीन ठिकाणी स्पर्धेचं चांगलं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच काही टीमनी स्पर्धा फक्त मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये होतील, याच हिशोबाने तयारी सुरू केली होती, पण आता ही योजना पूर्णपणे बदलली आहे.

6 ठिकाणांमुळे टीमना भीती

टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, 'हे खूप भीतीदायक आहे. फक्त दोन शहरांमध्ये आयपीएलचं आयोजन करणं योग्य राहिलं असतं. 2020 साली स्पर्धा फक्त तीन ठिकाणी खेळवण्यात आली आणि यशस्वीही झाली. टीमनी तयारी सुरू केली होती. मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये मॅच होतील, असं सगळ्यांना वाटत होतं. पण अचानक सगळं बदललं. नक्की काय होणार आहे, हे फ्रॅन्चायजीना कळावं,' असं एका आयपीएल टीमचा मालक म्हणाला.

मुंबईमध्ये आयपीएल खेळायला हिरवा कंदील मिळाला आहे, पण कोरोनामुळे प्रेक्षकांशिवायच सामने होतील, तर दुसऱ्या शहरांमध्ये फक्त 50 टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल, असं सांगितलं जात आहे. पण बीसीसीआयने याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुढच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत आयपीएलबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

Published by: Shreyas
First published: February 28, 2021, 10:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या