अबु धाबी, 29 सप्टेंबर : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला बुधवारी दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो संपूर्ण मोसम बाहेर झाला आहे. अर्जुन तेंडुलकरच्याऐवजी सिमरजीत सिंग याची उरलेल्या सामन्यांसाठी टीममध्ये निवड केल्याचं मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सांगितलं आहे.
डावखुरा फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकरला मुंबईने या वर्षाच्या सुरुवातीला लिलावात विकत घेतलं होतं. अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सने लिलावात 20 लाख रुपये खर्च केले होते. अर्जुन तेंडुलकरच्या जागी टीममध्ये आलेल्या सिमरजीत सिंग (Simarjeet Singh) याने नियमानुसार असलेला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली आहे.
🚨 Squad Update 🚨 Right-arm medium pacer Simarjeet Singh will be replacing Arjun Tendulkar for the remainder of #IPL2021 📰 Read all the details 👇#OneFamily #MumbaiIndians https://t.co/AcfBJsYf2w
— Mumbai Indians (@mipaltan) September 29, 2021
अर्जुन तेंडुलकरला अजूनही आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नव्हती. या मोसमात तो नेट बॉलर म्हणूनच टीमच्या बॅट्समनना सराव देत होता.
कोण आहे सिमरजीत सिंग?
सिमरजीत सिंग हा नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. सिमरजीतने 15 टी-20 सामन्यांमध्ये 20.50 ची सरासरी आणि 7.76 च्या इकोनॉमी रेटने 18 विकेट घेतल्या आहेत. 2020-21 च्या विजय हजारे ट्रॉफी (50 ओव्हर) मध्ये सिमरजीत सिंग दिल्लीचा सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू होता. या स्पर्धेत त्याने 5.65 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट घेतल्या होत्या.
मुंबई इंडियन्सने मंगळवारी पंजाब किंग्सचा पराभव केला, यानंतर आता मुंबईचा सामना 2 ऑक्टोबरला शारजाहमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun Tendulkar, IPL 2021, Mumbai Indians, Sachin tendulkar