मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ऋषभ पंतकडून काढून घेतली जाणार दिल्लीची कॅप्टन्सी, जाणून घ्या कारण

IPL 2021 : ऋषभ पंतकडून काढून घेतली जाणार दिल्लीची कॅप्टन्सी, जाणून घ्या कारण

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला, यानंतर आता आयपीएलचे उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवले जाणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 29 मे : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला, यानंतर आता आयपीएलचे उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवले जाणार आहे. बीसीसीआयची शनिवारी विशेष साधारण सभा झाली, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये मोठा बदल व्हायची शक्यता आहे. पहिल्या सत्रात दिल्लीला पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर नेणाऱ्या ऋषभ पंतला (Rishabh Pant) कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. स्पोर्ट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी फिट झाला, तर तो दिल्लीचा कर्णधार असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली, यानंतर त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, त्यामुळे अय्यर आयपीएल खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी ऋषभ पंतला दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं. ऋषभ पंतने एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) हरवून कर्णधार म्हणून आयपीएलमधला आपला पहिला विजय मिळवला. पंतच्या नेतृत्वात दिल्लीने 8 पैकी 6 मॅच जिंकत 12 पॉईंट्स कमावले, तसंच पॉईंट्स टेबलमध्येही पहिलं स्थान गाठलं. दिल्लीनंतर चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर राहिली. बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोलकाता, दिल्ली, हैदराबाद टीमचे काही खेळाडू आणि चेन्नईच्या टीमचे प्रशिक्षक यांना कोरोनाची लागण झाली होती. आयपीएलचा मागचा मोसमही कोरोनामुळेच युएईमध्ये खेळवण्यात आला होता.
First published:

Tags: Cricket news, Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant, Shreyas iyer

पुढील बातम्या