Home /News /sport /

IPL 2021 : कोरोना संकटात आयपीएल खेळवण्यापेक्षा... शोएब अख्तरचा BCCI ला सल्ला

IPL 2021 : कोरोना संकटात आयपीएल खेळवण्यापेक्षा... शोएब अख्तरचा BCCI ला सल्ला

कोरोनाच्या संकटात (Corona Virus) भारताने आयपीएलला (IPL 2021) स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) दिला आहे.

    मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाच्या संकटात (Corona Virus) भारताने आयपीएलला (IPL 2021) स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) दिला आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं आहे. भारतात प्रत्येक दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत, तसंच 2 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. भारतामध्ये या परिस्थितीत आयपीएल खेळवण्यावर याआधीही अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आयपीएल स्थगित करण्याचं आवाहन केलं आहे. 'सध्या भारताची स्थिती खूप खराब आहे, त्यामुळे आयपीएलच्या उरलेल्या मॅच स्थगित केल्या पाहिजेत. आयपीएलमध्ये जे पैसे खर्च होणार आहेत, त्यात ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्या,' असं शोएब अख्तर या व्हिडिओमध्ये म्हणाला. याचसोबत शोएब अख्तरने पीएसएलही स्थगित करण्याची मागणी केली. जेव्हा एखादा देश अशा परिस्थितीमध्ये असेल तेव्हा असं मनोरंजन नको, आम्हाला आयपीएल आणि पीएसएलही (PSL) नको, अशी प्रतिक्रिया शोएबने दिली. 'या कठीण परिस्थितीमध्ये लोकांचा जीव वाचवण्याचा विचार केला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी होणारा खर्च ऑक्सिजन सिलेंडरसाठी झाला पाहिजे. भारत सध्या जळत आहे, आयपीएलचं आयोजन करण्यापेक्षा त्याला स्थगिती दिली पाहिजे. पाकिस्तानमध्येही जून महिन्यात पीएसएल होणार आहे, त्यालाही रद्द केलं पाहिजे,' असं वक्तव्य शोएबने केलं. याआधी शोएब अख्तरने पाकिस्तानी नागरिकांनी भारताची मदत करावी, अशी मागणी केली होती. दुसऱ्या लाटेमध्ये भारताची परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे मदतीसाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे, असं आवाहन शोएबने पाकिस्तानी नागिरकांना केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, IPL 2021, Shoaib akhtar

    पुढील बातम्या