IPL 2021 : आयपीएलच्या आणखी दोन टीमना धक्का, हे खेळाडू घरी परतणार!

IPL 2021 : आयपीएलच्या आणखी दोन टीमना धक्का, हे खेळाडू घरी परतणार!

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातल्या (IPL 2021) अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. बांगलादेशचे खेळाडू स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतू शकतात. ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) केकेआरकडून आणि फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahaman) राजस्थानकडून (Rajasthan Royals) आयपीएलमध्ये खेळत आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 मे : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातल्या (IPL 2021) अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर केकेआर आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यातला सामना पुढे ढकलण्यात आला, यानंतर आता बांगलादेशचे खेळाडू स्पर्धा अर्धवट सोडून घरी परतू शकतात. ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) केकेआरकडून आणि फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahaman) राजस्थानकडून (Rajasthan Royals) आयपीएलमध्ये खेळत आहेत. बांगलादेशमध्ये कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत, त्यामुळे या दोघांनाही परतावं लागू शकतं.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख निजामुद्दीन चौधरी म्हणाले, 'नव्या कोरोना प्रोटोकॉलमुळे नागरिकांना लवकर परतावं लागू शकतं. नव्या नियमानुसार 1 मेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना यातून सूट पाहिजे असेल, तर आरोग्य मंत्रालयाकडून विशेष सूट घ्यावी लागेल.'

याआधी बोर्डाने परदेशी कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंसाठी कमी क्वारंटाईन कालावधीसाठी परवानगी घेतली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वाढलेल्या कोरोनामुळे बोर्डापुढे नवी अडचण निर्माण झाली. बांगलादेशची टीम श्रीलंकेवरून परतणार आहे, पण त्यांच्यासाठी हे नियम लागू नाहीत.

आम्ही दोन्ही खेळाडूंचा पुढच्या 15 दिवसांचा प्लान मागितला आहे, तसंच आरोग्य मंत्रालयालाही दोन्ही खेळाडूंच्या क्वारंटाईन कालावधीबाबतची माहिती मागितली आहे, असं निजामुद्दीन चौधरी म्हणाले.

शाकीब आणि मुस्तफिजूर यांना 19 मेपर्यंत बांगलादेशमध्ये परतायचं होतं, यानंतर त्यांना 3 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार होतं. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातल्या वनडे सीरिजला 23 मेपासून सुरूवात होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने 7 किंवा 14 दिवसांचा क्वारंटाईन सांगितला तर दोघांनाही लवकर बांगलादेशला रवाना व्हावं लागेल, असं बोर्डाने सांगितलं.

मुस्तफिजूर रहमान बांगलादेशला परतला तर राजस्थानला मोठा धक्का बसेल, कारण त्यांच्याकडे सध्या चारच परदेशी खेळाडू उपलब्ध आहेत. जॉस बटलर, क्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर आणि मुस्तफिजूर राजस्थानकडून खेळत आहेत. राजस्थानने दक्षिण आफ्रिकेच्या गेराल्ड कोटझीसोबत करार केला आहे, पण त्याला भारतात आल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. आयपीएल नियमांनुसार एक टीम जास्तीत जास्त 4 परदेशी खेळाडूंना एका सामन्यात खेळवू शकते, अशात जर मुस्तफिजूर घरी परतला तर राजस्थानकडे चौथा परदेशी खेळाडूही उपलब्ध नाही.

राजस्थानचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएल खेळण्यासाठी आला नाही, तर बेन स्टोक्सचा (Ben Stokes) पहिल्या सामन्यात हात फ्रॅक्चर झाला, त्यामुळे तोही इंग्लंडला रवाना झाला. लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि एन्ड्रयू टाय (Andrew Tye) यांनी कोरोनाच्या भीतीमुळे आयपीएल सोडून परतण्याचा निर्णय घेतला.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 8:59 PM IST

ताज्या बातम्या