मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : आर्यन खानने या खेळाडूवर लावली होती बोली, आता KKR कडून करतोय धमाका!

IPL 2021 : आर्यन खानने या खेळाडूवर लावली होती बोली, आता KKR कडून करतोय धमाका!

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) धमाकेदार कामगिरी केली आहे. शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मालकीची टीम असलेली केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये 6 विजय मिळवत 12 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

दुबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) धमाकेदार कामगिरी केली आहे, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) पोहोचणं त्यांच्यासाठी सोपं झालं आहे. शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मालकीची टीम असलेली केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये 6 विजय मिळवत 12 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये कोलकात्याच्या उत्कृष्ट कामगिरीला त्यांचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) जबाबदार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याने लिलावात व्यंकटेश अय्यरवर बोली लावली होती. आर्यन खानने व्यंकटेशवर दाखवलेला हा विश्वास त्याने सार्थ ठरवला.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावात शाहरुख खान आणि जुही चावलाऐवजी (Juhi Chawala) त्यांची मुलं आयपीएल लिलावात सहभागी झाली होती. आर्यनसोबत लिलावाच्या टेबलवर जुही चावलाची मुलगी जान्हवीदेखील होती.

IPL 2021 : बबिताच्या नाही तर फक्त शाहरुखच्या अय्यरची हवा! कोण आहे KKR चा नवा हिरो?

कोणत्या खेळाडूंना टीममध्ये संधी द्यायची याचा निर्णय टीमचे मालक आणि मॅनेजमेंट मिळून घेतता. लिलावामध्ये आर्यनसोबत केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर, जय मेहता आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरही उपस्थित होते. आर्यनने दोनवेळची आयपीएल चॅम्पियन कोलकात्याच्या टीममध्ये व्यंकटेश अय्यरला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. आज हाच खेळाडू कोट्यवधी रुपयांच्या खेळाडूंवर भारी पडत आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात कोलकात्याने 7.55 कोटी रुपये खर्च केले.

IPL 2021 : व्यंकटेश अय्यरने सौरभ गांगुलीमुळे बदलली स्टाइल; सांगितलं खास कारण

व्यंकटेश अय्यरला कोलकात्याने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा संधी दिली. बॅट आणि बॉलनेही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अय्यरने आरसीबीविरुद्ध 41 रन, मुंबईविरुद्ध 53 रन आणि पंजाबविरुद्ध 67 रन केले. तसंच त्याने दिल्लीविरुद्ध 2 आणि पंजाबविरुद्ध एक विकेट घेतली. संजय मांजरेकर यांच्या मते व्यंकटेश अय्यरवर पुढच्या मोसमात 14 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागू शकते, असं भाकीत वर्तवलं आहे. तर सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाला हव्या असलेल्या ऑल राऊंडरची जागा व्यंकटेश अय्यर घेऊ शकतो, असं वक्तव्य केलं.

IPL 2021 : हार्दिकच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत, हा खेळाडू घेईल 'ऑलराऊंडर'ची जागा, गावसकरांना विश्वास

First published:
top videos

    Tags: Aryan khan, IPL 2021, KKR, Shahrukh khan