Home /News /sport /

IPL 2021 : आयपीएल तारखांची घोषणा होताच चेन्नईला बसला मोठा धक्का, धोनीच्या मेहनतीवर पाणी!

IPL 2021 : आयपीएल तारखांची घोषणा होताच चेन्नईला बसला मोठा धक्का, धोनीच्या मेहनतीवर पाणी!

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. रविवारी बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. पण यामुळे सगळ्यात मोठा धक्का चेन्नईच्या (CSK) टीमला बसणार आहे.

    मुंबई, 8 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. रविवारी बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यावेळी आयपीएलच्या सगळ्या मॅच या न्यूट्रल ठिकाणी होणार आहेत, म्हणजेच कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात सामने खेळायला मिळणार नाहीत. पण यामुळे सगळ्यात मोठा धक्का चेन्नईच्या (CSK) टीमला बसणार आहे. चेन्नईच्या सगळ्या मॅच या मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि कोलकात्यामध्ये होणार आहेत. चेन्नई त्यांच्या 14 पैकी 10 मॅच अशा मैदानांवर खेळणार आहे जिकडे स्पिन बॉलिंगला मदत होत नाही. आयपीएल लिलावामध्ये चेन्नईने त्यांची स्पिन बॉलिंग मजबूत केली होती. पण दिल्लीतल्या 4 मॅच वगळता इतर कुठेही त्यांच्या स्पिनरना फार मदत मिळणार नाही. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि कोलकात्याच्या इडन गार्डनवर स्पिन बॉलरला फार करिश्मा दाखवता येत नाही, तसंच ही मैदानं छोटी असल्यामुळे बॅट्समनही स्पिन बॉलिंगवर आक्रमण करतात. चेन्नईने यंदाच्या लिलावात मोईन अली आणि कृष्णप्पा गौतम या दोन स्पिनरना विकत घेतलं होतं. आता धोनी या दोन्ही स्पिनरचा वापर कसा करेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चेन्नईची संपूर्ण टीम महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, सॅम करन, जॉश हेजलवूड, इमरान ताहिर, फाफ डुप्लेसी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, मिचेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, नारायण जगदीशन, केएल आसिफ, लुंगी एनगिडी, साई किशोर, मोइन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, एम हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, के हरी निशांत
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Csk, IPL 2021, MS Dhoni, Sports

    पुढील बातम्या