मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : दिवस ठरला, पहिलाच सामना हाय व्होल्टेज ड्रामा! मुंबई इंडियन्स भिडणार या टीमशी

IPL 2021 : दिवस ठरला, पहिलाच सामना हाय व्होल्टेज ड्रामा! मुंबई इंडियन्स भिडणार या टीमशी

आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. या मोसमाच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) होणार आहे, असं वृत्त आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 जुलै : आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. या मोसमाच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE) होणार आहे, असं वृत्त आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्यामुळे आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली होती. आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उरलेल्या 31 सामन्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मोसमाच्या दुसऱ्या सत्रातला पहिला सामना मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Superkings) यांच्यात होणार असल्याचंही वृत्तात म्हणलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार युएईमधली पहिली मॅच शारजाहमध्ये खेळवली जाईल. मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही सामने दुबई, शारजाह आणि अबु धाबी या तीन स्टेडियममध्ये होतील. दुबईमध्ये 15 ऑक्टोबरला आयपीएलची फायनल होणार आहे, तर पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला दुबईमध्ये होईल. एलिमिनेटर आणि दुसरी क्वालिफायर शारजाहमध्ये होतील. 11 आणि 13 ऑक्टोबरला या सामन्याचं आयोजन केलं जाईल, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यानंतर 4 मे रोजी बीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मोसमाची अखेरची मॅच पंजाब आणि दिल्ली (Punjab Kings vs Delhi Capitals) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाली होती, हा सामना दिल्लीने 7 विकेटने जिंकला होता.

First published:

Tags: Cricket, Csk, IPL 2021, Mumbai Indians