मुंबई, 27 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विराट कोहलीच्या आरसीबीच्या (RCB) मदतीला धावली आहे. मुंबई इंडियन्सने आपला एक खेळाडू आरसीबीला दिला आहे. मुंबईच्या टीममध्ये रिझर्व्ह खेळाडू म्हणून असलेला स्कॉट कुगलाईन (Scott Kuggeleijn) याला बँगलोरने त्यांच्या टीममध्ये घेतलं आहे. बँगलोरच्या टीममध्ये असलेले केन रिचर्डसन आणि एडम झम्पा हे खेळाडू भारतात वाढत चाललेल्या कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, यानंतर बँगलोरने स्कॉट कुगलाईनची निवड केली. स्कॉट कुगलाईन हा सध्या मुंबईच्या टीमसोबत दिल्लीमध्ये आहे. लवकरच तो आरसीबीच्या टीममध्ये प्रवेश करेल.
एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) लवकरच ऑस्ट्रेलियाला परततील, तर दुसरीकडे एन्ड्रयू टाय (Andrew Tye) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांनीही आयपीएलमधून माघार घेतली. तर भारताचा ऑफ स्पिनर अश्विन (R Ashwin) यानेही कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुढची स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला.
कोण आहे स्कॉट कुगलाईन?
न्यूझीलंडचा स्कॉट कुगलाईन याआधीही आयपीएलमध्ये खेळला होता. 2019 साली स्कॉट चेन्नई सुपरकिंग्समध्ये होता. धोनीने त्याला दोन सामन्यांमध्ये संधी दिली होती, पण त्याला आयपीएलमध्ये एकही रन करता आली नव्हती, पण त्याने 2 विकेट घेतल्या होत्या.
स्कॉट कुगलाईनने न्यूझीलंडकडून 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, यात त्याने 19.75 च्या सरासरीने आणि 213.51 च्या स्ट्राईक रेटने 79 रन केले.
'कोणी खेळाडू देता का खेळाडू?' या टीमने दुसऱ्या फ्रॅन्चायजींकडे उधारीवर मागितले क्रिकेटपटू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rohit sharma, Virat kohli