नवी दिल्ली, 25 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्या 5 मॅच चेन्नईमध्ये खेळल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दिल्लीमध्ये पोहोचली आहे. मुंबईची टीम दिल्लीमध्ये पोहोचताच त्यांच्या टीममध्ये न्यूझीलंडचा ऑलराऊंडर स्कॉट कुगलाईन (Scott Kuggeleijn) दाखल झाला आहे. रिझर्व्ह प्लेयर म्हणून स्कॉट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला आहे. टीममधल्या एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर टीम स्कॉट कुगलाईनचा बदली खेळाडू म्हणून विचार करू शकते.
मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर जेम्स नीशमने (James Neesham) त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो टाकला आहे, यामध्ये स्कॉट स्नूकर खेळताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स पुढचे 4 सामने दिल्लीमध्ये खेळणार आहे. याआधी चेन्नईमध्ये झालेल्या 5 मॅचपैकी मुंबईला फक्त 2 मॅचमध्ये विजय मिळाला आणि 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.
स्कॉट कुगलाईन याआधीही आयपीएलमध्ये खेळला होता. 2019 साली स्कॉट चेन्नई सुपरकिंग्समध्ये होता. धोनीने त्याला दोन सामन्यांमध्ये संधी दिली होती, पण त्याला आयपीएलमध्ये एकही रन करता आली नव्हती, पण त्याने 2 विकेट घेतल्या होत्या.
स्कॉट कुगलाईनने न्यूझीलंडकडून 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, यात त्याने 19.75 च्या सरासरीने आणि 213.51 च्या स्ट्राईक रेटने 79 रन केले. आयपीएलमध्ये आता मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. गुरूवारी 29 एप्रिलला दिल्लीमध्ये हा सामना होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians