• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Queen तो पप्पा नी! सचिन आणि अर्जुनमध्ये रंगला Carrom चा सामना, पाहा VIDEO

Queen तो पप्पा नी! सचिन आणि अर्जुनमध्ये रंगला Carrom चा सामना, पाहा VIDEO

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) फक्त क्रिकेटच नाही तर इतर खेळांमध्येही सर्वोत्तम आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) दरम्यान सचिन तेंडुलकरने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.

 • Share this:
  मुंबई, 11 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) फक्त क्रिकेटच नाही तर इतर खेळांमध्येही सर्वोत्तम आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) दरम्यान सचिन तेंडुलकरने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मेंटर असलेला सचिन तेंडुलकर त्याचा मुलगा अर्जुनसोबत (Arjun Tendulkar) कॅरमचा सामना खेळला. यावेळी अर्जुनच्या टीममध्ये मुंबईचा विकेट कीपर आदित्य तरे होता. कॅरमच्या या सामन्यात सचिन तेंडुलकरने क्वीन एकदम जबरदस्त शॉट मारून घेतली. यानंतर सचिनने अर्जुनकडे पाहत त्याला डोळा मारला, मग अर्जुननेही नकारार्थी मान डोलावली. मुंबई इंडियन्सने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेयर केला आहे. अर्जुन आयपीएलमधून बाहेर अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडसाठी युएईला गेला होता, पण दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धा अर्ध्यात सोडावी लागली. अर्जुन तेंडुलकरच्याऐवजी सिमरजीत सिंग याची उरलेल्या सामन्यांसाठी मुंबईच्या टीममध्ये निवड करण्यात आली, पण सिमरजीत सिंगला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. डावखुरा फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकरला मुंबईने या वर्षाच्या सुरुवातीला लिलावात विकत घेतलं होतं. अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सने लिलावात 20 लाख रुपये खर्च केले होते, पण अर्जुन या मोसमात एकही सामना खेळला नाही. या मोसमात तो नेट बॉलर म्हणूनच टीमच्या बॅट्समनना सराव देत होता. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली. पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला यंदा प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळू शकला नाही. 14 मॅचमध्ये 7 विजय आणि 7 पराभवांसह पॉईंट्स मिळवत मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर राहिली. खराब नेट रनरेटमुळे मुंबईऐवजी कोलकात्याची टीम 14 पॉईंट्ससह प्ले-ऑफमध्ये पोहोचली.
  Published by:Shreyas
  First published: