मुंबई, 20 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) बॅट अजून शांतच आहे. पण विकेटच्या मागे तो अजूनही तेवढाच जलद आहे. सोमवारी राजस्थानविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात धोनीने पुन्हा हेच सिद्ध केलं. बॉलिंगमध्ये बदल असोत किंवा फिल्डरना योग्य ठिकाणी ठेवणं असो, एमएस धोनी संजू सॅमसनवर भारी पडला. या सामन्यात चेन्नईचा 45 रनने विजय झाला. चेन्नईचा या मोसमातला हा दुसरा विजय होता.
धोनीने खेळपट्टीमागून त्यांच्या बॉलरना सल्ले दिले, ज्यामुळे मॅचचा निकाल चेन्नईच्या बाजूने लागला. विकेट कीपिंग करत असताना धोनीने जडेजाला एक सल्ला दिला, ज्यानंतर लगेचच जॉस बटलरची (Jos Buttler) विकेट गेली. त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शिवम दुबेलाही (Shivam Dubey) जडेजाने एलबीडब्ल्यू केलं.
या सामन्यादरम्यान धोनीची एक मजेशीर कमेंटही सोशल मीडियावर व्हायरल झाली. जडेजाच्या (Ravindra Jadeja) एका ओव्हरमध्ये धोनी फिल्डिंग लावत होता, पण एक फिल्डर जागेवर नसल्यामुळे तो वैतागला. या व्हिडिओमध्ये धोनी फिल्डरला फाईन लेगच्या दिशेने पाठवत होता. 'यार एक खिलाडी हमेशा गायब हो जाता है,' असं धोनी म्हणाला. धोनीची ही कमेंट स्टम्प माईकमध्ये कैद झाली.
#CSKvRR #Dhoni best thing on internet. Dhoni on stump mic #jadeja pic.twitter.com/UYBR3pyuk8
— Amritansh Tiwari (@Amritansh777) April 19, 2021
आयपीएलच्या या मोसमात चेन्नईने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात टॉस हारल्यानंतर पहिले बॅटिंगला आलेल्या चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 188 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 143 रनच करता आले. या विजयानंतर चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. याआधी त्यांनी पंजाबवर 6 विकेटने विजय मिळवला होता, तर दिल्लीकडून त्यांचा 7 विकेटने पराभव झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.