मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएलआधी चॅम्पियन मुंबई आणि रोहितला फक्त एकाच गोष्टीची चिंता

IPL 2021 : आयपीएलआधी चॅम्पियन मुंबई आणि रोहितला फक्त एकाच गोष्टीची चिंता

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यावर्षी पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. या मोसमाआधी मुंबई आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना एकाच गोष्टीची चिंता असेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यावर्षी पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आता सहाव्यांदा आणि लागोपाठ तीनवेळा आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई मैदानात उतरेल. यावेळीदेखील मुंबईची टीम संतुलित दिसत असली तरी त्यांना फक्त एकाच गोष्टीची चिंता असेल, ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म.

मागच्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये रोहित शर्माची बॅट म्हणावी तशी तळपली नाही. आयपीएलमधल्या अन्य कर्णधारांच्या तुलनेत रोहित शर्माची बॅटिंग सरासरी सगळ्यात कमी आहे. असं असलं तरी मागच्या वर्षी दिल्लीविरुद्धच्या फायनलमध्ये रोहितने आक्रमक अर्धशतक करत मुंबईला विजय मिळवून दिला होता.

रोहितची कामगिरी

मागच्या 4 मोसमात रोहितला एकदाही 500 रनचा टप्पा ओलांडता आला नाही. 2020 साली रोहितने 12 मॅचमध्ये 27.66 च्या सरासरीने आणि 127.69 च्या स्ट्राईक रेटने 332 रन केले, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. तर 2019 साली रोहितला 15 सामन्यांमध्ये 28.92 च्या सरासरीने आणि 128.57 च्या स्ट्राईक रेटने 405 रन आणि 2 अर्धशतकं करता आली. 2018 साली त्याने 14 सामन्यांमध्ये 23.83 ची सरासरी आणि 133.02 च्या स्ट्राईक रेटेने आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 286 रन केले. 2017 साली रोहितने 17 मॅचमध्ये 333 रन केले, यात त्याची सरासरी 23.78, स्ट्राईक रेट 121.97 तसंच तीन अर्धशतकं होती.

केएल राहुल सगळ्यात यशस्वी

श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला (Rishabh Pant) आणि राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला (Sanju Samson) कर्णधार केलं आहे, त्यामुळे हे दोघं पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नेतृत्व करताना दिसतील. कर्णधार म्हणून केएल राहुलची (KL Rahul) कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. राहुलला मागच्या मोसमात पंजाबचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर 14 सामन्यांमध्ये त्याने 56 च्या सरासरीने रन केले. राहुलने मागच्या मोसमात एक शतक आणि 5 अर्धशतकांसह 670 रन केले. तर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 50 च्या सरासरीने 2,900 रन केले.

कोलकात्याने मागच्या मोसमात अर्ध्यातच इयन मॉर्गनला (Eoin Morgan) नेतृत्व दिलं. कर्णधार झाल्यावर मॉर्गनने 7 इनिंगमध्ये 49 च्या सरासरीने रन केले. तर बँगलोरचा कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) 124 इनिंगमध्ये 44 च्या सरासरीने 4,800 रन केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करण्याऱ्या कर्णधाराचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून 42 च्या सरासरीने 4 हजार रन तर रोहितने 30 च्या सरासरीने 3 हजार रन केले आहेत. कर्णधार म्हणून विराटने सर्वाधिक रन केले असले तरी त्याच्या आरसीबीला अजून एकही आयपीएल जिंकता आलेली नाही.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma