Home /News /sport /

IPL 2021 : बुटांवर 'स्पेशल मेसेज' लिहून रोहित उतरला मैदानात, काय आहे अर्थ?

IPL 2021 : बुटांवर 'स्पेशल मेसेज' लिहून रोहित उतरला मैदानात, काय आहे अर्थ?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (Mumbai Indians vs RCB) पहिल्या आयपीएल सामन्यात (IPL 2021) मैदानात उतरला.

    चेन्नई, 10 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (Mumbai Indians vs RCB) पहिल्या आयपीएल सामन्यात (IPL 2021) मैदानात उतरला. या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला असला तरी रोहित शर्माचं मात्र कौतुक होत आहे, कारण या मॅचमध्ये रोहितने त्याच्या बुटांवर खास मेसेज लिहिला होता. रोहितच्या बुटांवर एक शिंगी भारतीय गेंड्याचा फोटो होता. विलुप्त होत चाललेल्या या प्रजातीचं संरक्षण करण्यात यावं, असा संदेश देण्यासाठी रोहितने असे बूट घातले होते. तसंच त्याच्या बुटांवर सेव्ह द रायनो (गेंड्यांना वाचवा) असा संदेशही लिहिण्यात आला होता. रोहितने हा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरूनही शेयर केला आहे. 'एका दिवसाआधी मी जेव्हा आरसीबीविरुद्ध मैदानात खेळण्यासाठी उतरलो तेव्हा माझ्यासाठी ही फक्त एक मॅच नव्हती. क्रिकेट खेळणं हे कायमच माझं स्वप्न राहिलं. हे जग राहण्यासाठी आणखी चांगलं करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी हाच प्रयत्न करत आहे. हा हेतू मैदानापर्यंत घेऊन जाणं माझ्यासाठी खास होतं. ही गोष्ट माझ्या मनाच्या खूप जवळची आहे, यासाठीचं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे,' असं ट्वीट रोहितने केलं. बँगलोरविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा 19 रन करून रन आऊट झाला. एकशिंगी गेंड्यांना वाचवण्यची आपली मोहिम जगाला दाखवण्यात रोहितला यश आलं, पण पहिल्या सामन्यात त्याची टीम अपयशी ठरली. आरसीबीने मुंबईचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. रोहित या सामन्यात चांगली बॅटिंग करत होता, पण क्रिस लीनने त्याला आऊट केलं. यानंतर मुंबईची बॅटिंग गडगडली आणि त्यांना 20 ओव्हरमध्ये 159 रनपर्यंतच मजल मारता आली. 2013 पासून मुंबईचा ओपनिंग मॅचमधला हा लागोपाठ 9वा पराभव आहे. मुंबईचा पुढचा सामना 13 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्ससोबत चेन्नईमध्येच होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rohit sharma

    पुढील बातम्या