मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : चर्चा तर होणारच! हिटमॅन रोहित BMW घेऊन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

IPL 2021 : चर्चा तर होणारच! हिटमॅन रोहित BMW घेऊन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

इंग्लंडविरुद्धची सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे (India vs England) खेळाडू आयपीएलसाठी (IPL 2021) तयार होत आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) टीममध्ये दाखल झाला आहे.

मुंबई, 29 जानेवारी : इंग्लंडविरुद्धची सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे (India vs England) खेळाडू आयपीएलसाठी (IPL 2021) तयार होत आहेत. सीरिज संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खेळाडू त्यांच्या आयपीएल टीममध्ये सहभागी होत आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) टीममध्ये दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून रोहित शर्माच्या आगमनाचा व्हिडिओ शेयर केला आहे. BMW मधून रोहित मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला. मुंबईची टीम सध्या पवईच्या हॉटेलमध्ये थांबली आहे.

रोहित शर्माच्या आधी इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळलेले सूर्यकुमार यादव, (Suryakumar Yadav) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्याही (Krunal Pandya) टीममध्ये पोहोचले आहेत. कोरोना व्हायरसमुळे सगळ्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये जावं लागणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातली सीरिजही बायो-बबलमध्ये खेळवण्यात आली. बीसीसीआयच्या नियमांनुसार एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जाण्यासाठी खेळाडूंना क्वारंटाईन व्हायची गरज नाही, त्यामुळे इंग्लंडविरुद्धची सीरिज खेळलेले सगळे खेळाडू थेट त्यांच्या आयपीएल टीममध्ये दाखल होत आहेत.

9 एप्रिलपासून यावर्षीच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील लढतीनं या स्पर्धेचा 14 वा सिझन सुरु होईल. यंदाच्या सिझनमध्ये कोणतीही टीम त्यांच्या होम ग्राऊंडवर सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच ही चेन्नईत होणार आहे.

मुंबई इंडियन्सचे सामने चेन्नई, दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता या चार शहरांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेची बाद फेरी 25 मे पासून अहमदाबादमध्ये सुरु होणार असून 30 मे रोजी अहमदाबादमध्येच आयपीएल फायनल होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma