Home /News /sport /

IPL 2021 : धोनी शून्य रनवर आऊट होताच रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, पाहा कारण

IPL 2021 : धोनी शून्य रनवर आऊट होताच रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, पाहा कारण

चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची (IPL 2021) सुरुवातही खराब झाली आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) शून्य रनवर आऊट झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मात्र मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) निशाणा साधायला सुरुवात केली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 एप्रिल : चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची (IPL 2021) सुरुवातही खराब झाली आहे. या वर्षाची पहिलीच मॅच खेळणाऱ्या चेन्नईचा दिल्लीने 7 विकेटने पराभव केला आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) शून्य रनवर आऊट झाला. दुसऱ्याच बॉलवर आवेश खानने धोनीला बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर धोनी सोशल मीडियावर ट्रोल व्हायला लागला, पण धोनीच्या चाहत्यांनी मात्र मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) निशाणा साधायला सुरुवात केली. शून्य रनवर आऊट झाल्यानंतर धोनीवर टीका होऊ लागली. धोनीचं युग आता संपलं आहे, तसंच तो आता पुनरागमन करू शकत नाही, असं सोशल मीडियावर लिहिलं जाऊ लागलं. पण यानंतर धोनीचे चाहते त्याच्या बचावासाठी आले. हे करत असताना त्यांनी आयपीएलमधले रोहित शर्माचे आकडे दाखवले. आयपीएल इतिहासात रोहित धोनीपेक्षा जास्तवेळा शून्य रनवर आऊट झाला आहे. आयपीएलमध्ये धोनी चौथ्यांदा शून्य रनवर आऊट झाला आहे. तर रोहित शर्माला आयपीएल खेळताना 13 वेळा एकही रन करता आलेली नाही. तर एकूण टी-20 क्रिकेटमध्ये रोहित 20 वेळा आणि धोनी 6 वेळा शून्य रनवर आऊट झाला आहे. याआधी 6 वर्षांपूर्वी 2015 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनी पहिल्याच बॉलला माघारी परतला होता. तर 2010 साली तो राजस्थान आणि दिल्लीविरुद्धच शून्य रनवर आऊट झाला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Rohit sharma

    पुढील बातम्या