IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतर रियान परागची 'राहुल गांधी' स्टाईल, म्हणाला...

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतर रियान परागची 'राहुल गांधी' स्टाईल, म्हणाला...

आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 29 मॅच झाल्यानंतर आयपीएल स्थगित करावी लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 29 मॅच झाल्यानंतर आयपीएल स्थगित करावी लागली आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांना कोरोनाची लागण झाली, यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि इतर दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर मंगळवारी हैदराबादचा (SRH) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अमित मिश्रा (Amit Mishra) यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं, त्यामुळे बीसीसीआयला (BCCI) हा निर्णय घ्यावा लागला.

आयपीएल स्थगित केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान परागने राहुल गांधी स्टाईलमध्ये ट्वीट केलं. 'खतम, टाटा, बाय-बाय' असं रियान त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. सोबतच त्याने IPL 2021 आणि iplcancel हे दोन हॅशटॅगही वापरले.

ऑलराऊंडर असलेला रियान पराग (Riyan Parag) हा कायमच त्याच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतो. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) मॅचवेळी रियान पराग त्याच्या सेल्फी सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला होता. केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये विकेट घेतल्यानंतर रियान पराग आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांनी सेल्फी सेलिब्रेशन केलं. कोलकात्याच्या दोन विकेट पडल्यानंतर बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या रियान पराग आणि राहुल तेवतियांनी बॉल हातात ठेवून सेल्फी काढत असल्याची नक्कल केली.

याआधी आयपीएलच्या मागच्या मोसमात रियान परागच्या बिहू डान्सचं सेलिब्रेशनही व्हायरल झालं होतं. आसामचं लोकनृत्य असलेला बिहू डान्सचं सेलिब्रेशन राजस्थानच्या इतर परदेशी खेळाडूंनीही केलं होतं.

आयपीएलच्या या मोसमात राजस्थानची (Rajasthan Royals) कामगिरी समाधानकारक झाली नाही. 7 पैकी 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला, तर त्यांना 5 सामने गमवावे लागले. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान पाचव्या क्रमांकावर राहिली. या मोसमात राजस्थानला सुरुवातीपासूनच धक्के बसले. जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) दुखापत झाल्यामुळे तो खेळण्यासाठी येऊ शकला नाही, तर बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) हाताला पहिल्याच सामन्यावेळी फ्रॅक्चर झाल्यामुळे तोदेखील इंग्लंडला निघून गेला. एन्ड्रयू टाय (Andrew Tye) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांनी भारतातली कोरोनाची स्थिती बघून मायदेशी परतण्याचं ठरवलं. शेवटच्या काही सामन्यांमध्ये राजस्थानला फक्त 4 परदेशी खेळाडू उपलब्ध असल्यामुळे त्या सगळ्यांना खेळवावं लागलं.

Published by: Shreyas
First published: May 4, 2021, 8:04 PM IST

ताज्या बातम्या