IPL 2021 : 12 लाख रुपयांच्या दंडाची भीती, ऋषभ पंतने अंपायरला सुनावलं!

IPL 2021 : 12 लाख रुपयांच्या दंडाची भीती, ऋषभ पंतने अंपायरला सुनावलं!

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) बीसीसीआयने (BCCI) निमय कडक केले आहेत. स्लो ओव्हर रेटमुळे या मोसमात कर्णधारांना दंडाची मोठी रक्कम द्यावी लागणार आहे, याची भीती ऋषभ पंत (Rishabh Pant) यालाही वाटत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) बीसीसीआयने (BCCI) निमय कडक केले आहेत. स्लो ओव्हर रेटमुळे या मोसमात कर्णधारांना दंडाची मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला याचा फटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे धोनीला 12 लाखांचा दंड भरावा लागला. आयपीएलच्या नव्या नियमांनुसार प्रत्येक टीमला 90 मिनीटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक आहे, म्हणजेच प्रत्येक टीमला तासाला 14.1 ओव्हर फेकणं बंधनकारक आहे. 90 मिनिटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण केल्या नाहीत तर कर्णधाराला दंडाचं प्रावधान आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यात गुरूवारी झालेल्या मॅचमध्येही या दंडाची भीती पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थानची बॅटिंग सुरू असताना घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सातव्या ओव्हरमध्ये शिवम दुबे (Shivam Dubey) आणि डेव्हिड मिलर (David Miller) बॅटिंग करत होते, तर अश्विनच्या (R Ashwin) हातात बॉल होता. ओव्हरचा चौथा बॉल टाकत असताना अंपायरने अश्विनला थांबवलं. तीस यार्डच्या बाहेर नियमानुसार फिल्डर आहेत का, हे पाहण्यासाठी अंपायरने काही वेळ घेतला. यानंतर विकेट कीपिंग करत असणारा ऋषभ पंत (Rishabh Pant) अंपायरमुळे एक मिनीट फुकट गेला, असं म्हणाला. एक मिनीट उशीर तुमच्यामुळे झाला, माझ्यामुळे नाही, असं ऋषभ पंत म्हणाल्याचं स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. पंतचं हे बोलणं ऐकून कॉमेंटेटरनाही हसू आवरलं नाही.

आयपीएलच्या नव्या नियमांनुसार प्रत्येक टीमला 90 मिनिटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. याआधी 20 वी ओव्हर 90व्या मिनिटाला सुरू करण्याचा नियम होता. 90 मिनिटांच्या या खेळात अडीच-अडीच मिनिटांचे दोन टाईम आऊट आहेत. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. या हिशेबाने प्रत्येक टीम तासाला 14.11 ओव्हर टाकेल. जर टीमला मर्यादित वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत, तर त्यांचं मानधन कापलं जाणार आहे, याच कारणामुळे धोनीला दंड भरावा लागला.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 8:11 PM IST

ताज्या बातम्या