नवी दिल्ली, 30 मार्च : टीम इंडियाचा धमाकेदार बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याची दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) कर्णधारपदी निवड झाली आहे. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतला ही जबाबदारी मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग कताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. फोर अडवताना तो खांद्यावर पडला होता. दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यर सीरिजमधून बाहेर झाला होता.
स्पोर्ट्स टुडेच्या वृत्तानुसार शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यर कमीत कमी चार ते पाच महिने क्रिकेटपासून लांब राहू शकतो, त्यामुळे अय्यर संपूर्ण आयपीएल खेळणार नाही, म्हणून ऋषभ पंतला दिल्लीने कर्णधार बनवलं.
ANNOUNCEMENT Rishabh Pant will be our Captain for #IPL2021 ✨@ShreyasIyer15 has been ruled out of the upcoming season following his injury in the #INDvENG series and @RishabhPant17 will lead the team in his absence #YehHaiNayiDilli
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 30, 2021
दिल्लीच्या टीमकडे ऋषभ पंतशिवाय अन्य दिग्गज खेळाडूही उपलब्ध होते. यामध्ये अश्विन (Ashwin), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हे पर्याय होते, पण दिल्लीच्या टीम प्रशासनाने ऋषभ पंतवर विश्वास दाखवला. मागच्या मोसमात पंत दिल्लीचा उपकर्णधार होता, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमध्ये पंतकडे नेतृत्व जाणं स्वाभाविक मानलं जात होतं.
ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करणारा 12 वा खेळाडू असेल. याआधी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, जेम्स होप्स, महेला जयवर्धने, डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन यांनी दिल्लीचं नेतृत्व केलं. याशिवाय जेपी ड्युमिनी, झहीर खान, करुण नायर आणि श्रेयस अय्यरही दिल्लीचे कर्णधार होते. आतापर्यंत एकदाही दिल्लीला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. मागच्या मोसमात दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलची फायनल गाठली होती, पण अंतिम सामन्यात मुंबईने त्यांचा पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.