...तर या देशात होणार IPL 2021 चे उर्वरित सामने, समोर आली महत्त्वाची माहिती

...तर या देशात होणार IPL 2021 चे उर्वरित सामने, समोर आली महत्त्वाची माहिती

IPL 2021: उर्वरित सीझन कधी कुठं होणार याबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच इंग्लिश काउंटींच्या एका ग्रुपने आयपीएल 2021 चं (IPL-2021) आयोजन करण्याची तयारी दाखवल्यामुळे ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे: बीसीसीआय आयोजित करत असलेली इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा (IPL 2021) विविध फ्रँचायझीमधील खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यामुळे या वर्षी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. 14 व्या सीझनमधल्या 29 मॅचेस झाल्यानंतर हा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला. त्यामुळे उर्वरित सीझन कधी कुठं होणार याबाबत चर्चा सुरू झाली. त्यातच इंग्लिश काउंटींच्या एका ग्रुपने आयपीएल 2021 चं (IPL-2021) आयोजन करण्याची तयारी दाखवल्यामुळे ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. या काउंटींमध्ये एमसीसी, सरे, वॉरविकशायर, लँकशायर, द किआ ओव्हल, एजबस्टन आणि अमिरात ओल्ड ट्रॅफर्ड या ठिकाणांचा समावेश आहे. या काउंटीने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून आयपीएलच्या उर्वरित सीझनचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे वाचा-IPL 2021 स्थगित होताच अँकर झाली निवांत, नवऱ्याला लावलं कामाला...

क्रिकइन्फो वेबसाइटच्या बातमीनुसार आयसीसी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एनसीईच्या (National Chief Executive) व्हर्च्युअल बैठकीत हा विषय मांडला जाईल. सप्टेंबर महिन्यात आयपीएलचा सीझन पूर्ण करण्याबरोबरच जे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत त्यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मदत करू असंही या काउंटीच्या ग्रुपने म्हटलं आहे. तसंच इंग्लंडमध्ये आयपीएल स्पर्धा झाली तर प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने होऊ शकतील असा विश्वास या काउंटींच्या ग्रुपला वाटतो. या वर्षी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा (T-20 Cricket World Cup) भारतात होणार आहे पण कोरोनाची परिस्थिती पाहता ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये घ्यावी लागेल अशी शक्यता आतापासूनच व्यक्त होत आहे.

हे वाचा-भारतीय क्रिकेटपटूच्या घरी कोरोनाचा कहर! आईनंतर बहिणीचंही निधन

जर दुबईत आयपीएलचा उर्वरित सिझन झाला तर एका दिवशी दोन किंवा तीन मॅचेसही खेळवल्या जाऊ शकतात. ग्रुप स्टेजच्या आणि नॉक-आउट मॅचमध्येही अंतर नसेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

टी-20 वर्ल्ड कप कुठे घ्यायचा हा विचार केल्यास तो इंग्लंडमध्येही होऊ शकतो. तिथे आयसोलेशनची व्यवस्था करावी लागेल. भारत आणि इंग्लंडदरम्यान होणारी टेस्ट सीरिज 14 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर इंग्लंड टीम पाकिस्तानात टी-20 मालिका खेळणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे तयारीला कमी वेळ असेल. पण काउंटींच्या ग्रुपला असं वाटतंय की जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक (International Cricket Timetable) निश्चित असलं तरीही आयपीएलसाठी वेळ मिळू शकतो. कोरोनाची परिस्थिती इतकी भयावह आहे की कधी काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे सध्या तरी चर्चाच सुरू आहेत.

First published: May 7, 2021, 1:10 PM IST

ताज्या बातम्या