ही दोस्ती तुटायची नाय, धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम

ही दोस्ती तुटायची नाय, धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम

मागच्यावर्षी एमएस धोनीसोबतच रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आयपीएल खेळण्यासाठी तो युएईला गेला. पण

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी : आयपीएलमध्ये (IPL 2021)दादा टीम असलेल्या सीएसके (CSK) अर्थात चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) आता अनेक बदल पाहण्यास मिळणार आहे. चेन्नईला आपल्या टीममध्ये कायम राहणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करत आहे. आता केदार जाधव, मुरली विजय आणि पियुष चावला या खेळाडूंना टीममधून मुक्त करण्यात येणार आहे. तर सुरेश रैना हा संघात कायम असणार आहे.

आयपीएलच्या या मोसमासाठी (IPL 2021) सगळ्या 8 टीमना त्यांनी कायम ठेवलेल्या आणि सोडून दिलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर करावी लागणार आहे.चेन्नई सुपर किंग्सने गेल्या कित्येक हंगामात आपल्या खेळाडूंमध्ये फारसे काही बदल केले नाही. पण, आयपीयएलच्या नियमांमुळे टीममधील खेळाडूंना आता एका प्रकारे कमी करावे लागत आहे.

महेंद्र सिंग धोनीचा खास खेळाडू असलेल्या सुरेश रैना हा संघात कायम असणार आहे. त्याच्यासोबत ओपनीचा धडाकेबाज फलंदाज फा ड्युप्लसी, आणि मधल्या फळीतला गोलंदाज डायन ब्रावो कायम राहणार आहे. तर केदार जाधव, मुरली विजय आणि पियुष चावला या खेळाडूंना टीममधून मुक्त करण्यात येणार आहे.

मागच्यावर्षी एमएस धोनीसोबतच रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आयपीएल खेळण्यासाठी तो युएईला गेला. पण कोरोना आणि बायो-बबलचं कारण देत रैना भारतात परतला. चेन्नईच्या टीमसोबत रैनाचे वाद झाल्याचंही बोललं गेलं. रैनाने 193 आयपीएल मॅचमध्ये 33.34 च्या सरासरीने आणि 137.14 च्या स्ट्राईक रेटने 5,368 रन केल्यात.

Published by: sachin Salve
First published: January 20, 2021, 6:03 PM IST
Tags: IPL 2021

ताज्या बातम्या