मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Eliminator अवघ्या काही तासांवर, पण RCB ने दोन बड्या खेळाडूंना केलं रिलीज

IPL 2021 Eliminator अवघ्या काही तासांवर, पण RCB ने दोन बड्या खेळाडूंना केलं रिलीज

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या एलिमिनेटरआधी आरसीबीने (RCB) त्यांच्या टीममधल्या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना रिलीज केलं आहे.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 11 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या एलिमिनेटरआधी आरसीबीने (RCB) त्यांच्या टीममधल्या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना रिलीज केलं आहे. वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुष्मंता चमिरा (Dushmantha Chameera) हे श्रीलंकेचे दोन्ही खेळाडू आरसीबीच्या बायो-बबलमधून बाहेर आले आहेत. हसरंगा आणि चमिरा आता टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) श्रीलंकेच्या टीममध्ये दाखल झाले आहेत. या दोघांनाही आरसीबीने आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडसाठी टीममध्ये घेतलं होतं.

आरसीबी आणि कोलकाता (RCB vs KKR) यांच्यात आज एलिमिनेटरचा सामना होणार आहे. शारजाहमध्ये हा मुकाबला रंगेल. त्याआधी आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हसरंगा आणि चमिरा टीमच्या बायो-बबलमधून बाहेर गेल्याचं सांगितलं.

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये वानिंदु हसरंगाला दोन मॅच खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही, तसंच त्याला फक्त एक रन करता आली. तर चमिराची एकाही मॅचमध्ये निवड झाली नाही. हसरंगा आणि चमिरा यांनी भारताच्या श्रीलंका दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसंच आरसीबीच्या काही खेळाडूंनी कोरोना व्हायरसचं कारण देत आयपीएलमधून माघार घेतली, त्यामुळे विराट कोहलीने या दोघांना आरसीबीच्या टीममध्ये स्थान दिलं.

आरसीबी आणि केकेआर यांच्यातल्या एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर जी टीम विजयी होईल त्यांना दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळावा लागेल. त्या सामन्यात ज्यांचा विजय होईल ती टीम फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल.

First published:

Tags: IPL 2021, RCB