शारजाह, 3 ऑक्टोबर : आरसीबीचा (RCB) ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रविवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या (RCB vs PBKS) मॅचमध्ये मॅक्सवेलने 33 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली, यामध्ये 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 164 रन केले. मॅक्सवेलशिवाय पडिक्कलने 40 रनचं योगदान दिलं. मोहम्मद शमीने अखेरच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या, तर मोईसेस हेनरिक्सलाही 3 विकेट घेण्यात यश आलं.
ग्लेन मॅक्सवेलने या इनिंगमध्ये 97 मीटर लांब सिक्स मारला. इनिंगच्या 15 व्या ओव्हरमध्ये मॅक्सवेलने लागोपाठ दोन सिक्स मारले. रवी बिष्णोईच्या या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर मॅक्सवेलने डीप मिड-विकेटच्या वरून शॉट मारला आणि बॉल थेट स्टेडियमबाहेर रस्त्यावरच गेला. यानंतर पुढच्या बॉलला त्याने लॉन्ग ऑनच्या दिशेने सिक्स टोलवला.
VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. 9.3 ओव्हरमध्येच दोघांनी 68 रन केले. हेनरिक्सने 10 व्या ओव्हरमध्ये ही पार्टनरशीप तोडली. विराट कोहलीने त्याने 25 रनवर बोल्ड केलं. यानंतर पुढच्याच बॉलला डॅनियल ख्रिश्चन शून्य रनवर आऊट झाला.
मॅक्सेवल आणि एबी डिव्हिलियर्सने चौथ्या विकेटसाठी 73 रन जोडले. एबीला सरफराज खानने रन आऊट केलं. 18 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने त्याने 23 रन केले. इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये शमीने उत्कृष्ट बॉलिंग करत 3 विकेट मिळवल्या. दुसऱ्या बॉलवर मॅक्सवेल, चौथ्या बॉलवर शाहबाज अहमद आणि पाचव्या बॉलवर जॉर्ज गार्टन माघारी परतले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.