मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

End of RCB Captaincy: शेवटच्या सामन्यानंतर भावुक झाला विराट; डोळ्यात तरळले अश्रू, VIDEO

End of RCB Captaincy: शेवटच्या सामन्यानंतर भावुक झाला विराट; डोळ्यात तरळले अश्रू, VIDEO

end of RCB #captaincy; विराटच्या डोळ्यांत पाणी,  रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

end of RCB #captaincy; विराटच्या डोळ्यांत पाणी, रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने (virat kohli end of RCB captaincy) काल अखेरचा सामना खेळला. विराटच्या अखेरच्या नेतृत्वात बंगळुरुला कोलकाताकडून पराभव स्विकारावा लागला.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने (virat kohli end of RCB captaincy) काल अखेरचा सामना खेळला. आयपीएल 2021मध्ये(IPL2021) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुचा(RCB vs KKR) 4 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे कर्णधारपदाचा शेवट विराटसाठी निराशाजनक राहिला. सामन्यानंतर तो भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा रडतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या पराभवानंतर विराटच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या. विराटच्या डोळ्यांत पाणी दाटून आलेले सर्वांनी पाहिले आणि त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहतेही भावनिक झाले.

2013 च्या हंगामात कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली जेव्हा डॅनियल व्हिटोरी या पदावरून पायउतार झाला. विराटच्या कारकिर्दीत RCB ने 2016 मध्ये अंतिम फेरीसह चार वेळा प्लेऑफ गाठली आहे.

RCB चे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयामागे आहेत दोन मोठी कारणे

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी भारतीय ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर लगेचच त्याने आरसाबी संघाचेही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहिर केला.

कॅप्टनसी सोडण्याचं सर्वात मोठं कारण हे वर्कलोड आहे, असं विराटनं सांगितलं. विराट गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा तीन्ही प्रकारातील कॅप्टन आहे. त्याचबरोबर तो आरसीबीचाही कॅप्टन आहे. त्याचबरोबर मी माझ्या जबाबदारीशी अप्रामाणिक राहू शकत नाही, असेही विराटने स्पष्ट केले. 'मी या 120 टक्के योगदान देऊ शकत नसेल तर पदावर चिकटून राहण्यात मला काहीही स्वारस्य नाही,' असं विराटनं स्पष्ट केलं.

विराटनं कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करतानाही वर्कलोडचा मुद्दा स्पष्ट केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कामगिरीतही घसरण झाली आहे. तसंच टीम इंडियाला आजवर एकही आयसीसी ट्रॉफी किंवा आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात विराटला आजवर अपयश आले आहे.

सर्वाधिक 140 सामने फ्रँचायझीचे नेतृत्वकरूनही जेतेपदाची पाटी कोरी राहणारा विराट हा एकमेव कर्णधार ठरला आहे. विराटने 140 सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी 66 सामने जिंकले, तर 70 मध्ये पराभव पत्करला. 139 डावांमध्ये त्यानं 5 शतके व 35 अर्धशतकांसह 41.99च्या सरासरीने 4871 धावा केल्या.

First published:

Tags: RCB, Virat kohli