• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL चा आजचा सामना विराट कोहलीसाठी असणार खास; नव्या विक्रमाची होणार नोंद

IPL चा आजचा सामना विराट कोहलीसाठी असणार खास; नव्या विक्रमाची होणार नोंद

आजची मॅच ही विराट कोहलीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. त्याने T20 बरोबर RCB संघाचं कर्णधारपदही सोडलं यासाठी नाही तर...

  • Share this:
नवी दिल्ली, 2० सप्टेंबर: इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या (IPL-2021) दुसऱ्या टप्प्याला आजपासून (20 सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटविश्व (Cricket) अनेक घटनांमुळे ढवळून निघालं आहे. त्यातच कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli quits captaincy) काही धक्कादायक घोषणाही केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा आजपासून सुरू होणारा दुसरा टप्पा विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. त्यातच आजची मॅच ही विराट कोहलीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. एकाच फ्रॅन्चायझीसाठी 200 मॅच खेळणारा विराट कोहली हा पहिला क्रिकेटर ठरणार आहे. याबाबतचं वृत्त `आज तक`नं दिलं आहे. आयपीएल-2021च्या 14व्या सिझनमधली 31 वी मॅच आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या संघांमध्ये होत आहे. ही मॅच अबुधाबीमधल्या शेख जायद स्टेडियमवर होईल. या सीझनमध्ये दुसऱ्यांदा हे दोन संघ एकमेकांसमोर येत आहेत. यापूर्वीच्या मॅचमध्ये आरसीबीनं केकेआरला पराभूत केलं होतं. सध्या विराट कोहली त्याने घेतलेल्या धक्कादायक निर्णयामुळे विशेष चर्चेत आहे. त्यानं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीमचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी आरसीबीनं ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आयपीएल-2021 हा सीझन कर्णधार म्हणून विराटसाठी अखेरचा असेल. IPL 2021: पोलार्डची एक चूक ठरली मुंबईला भारी, धोनीला मिळालं विजयाचं गिफ्ट 'आरसीबीचा कॅप्टन म्हणून ही माझी अखेरची आयपीएल असेल. आयपीएलच्या शेवटच्या मॅचपर्यंत मी टीममधला एक खेळाडू म्हणून कार्यरत राहीन. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि मला पाठिंबा दर्शवणाऱ्या आरसीबीच्या सर्व चाहत्यांचा मी ऋणी आहे,' असं विराट कोहलीनं सांगितलं. केकेआरविरुद्ध आरसीबीची टीम कोरोना योद्ध्यांच्या (Corona Warriors) सन्मानार्थ निळी जर्सी (Blue Jersey) परिधान करून मैदानात उतरणार आहे. ही निळी जर्सी पीपीई किटच्या (PPE Kit) कलरशी मिळतीजुळती आहे. कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आरसीबी आयपीएलमधली एका मॅच निळी जर्सी परिधान करून खेळेल, असं आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीने 2 मे रोजी जाहीर केलं होतं. परंतु, कोरोनामुळे त्यानंतर दोन दिवसांनी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. मोठी बातमी: भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, BCCI नं जाहीर केली भक्कम पगारवाढ! आज आयपीएल मॅचदरम्यान जेव्हा विराट कोहली स्टेडियमवर उतरेल, तेव्हा एक इतिहास घडणार आहे. कारण आयपीएलमधल्या एकाच फ्रॅंचायझीसाठी 200 मॅचेस खेळणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. हेच त्याच्या विक्रमाचं वेगळेपमे आहे. विराटच्या आधी अनेक खेळाडूंनी 200 मॅचेस खेळल्या आहेत. महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि सुरेश रैनानं या लीगमध्ये 200 मॅचेस खेळण्याचा पराक्रम केला आहे. यात आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीनं 212, रोहित शर्मानं 207, दिनेश कार्तिकनं 203, सुरेश रैनानं 201 मॅचेस खेळल्या असून विराट कोहलीनं 199 मॅचेस खेळल्या आहेत. आजची मॅच ही विराटची 200 वी मॅच असेल.
First published: