• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : RCB विरोधात तीन चुकीचे निर्णय, विराट कोहलीचा अंपायरशी पंगा, VIDEO

IPL 2021 : RCB विरोधात तीन चुकीचे निर्णय, विराट कोहलीचा अंपायरशी पंगा, VIDEO

आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर (IPL 2021 Eliminator) सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अंपायरवर चांगलाच संतापला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR vs RCB) सामन्यात अंपायर वीरेंद्र शर्मा (Umpire Virender Sharma) यांनी तीन चुकीचे निर्णय दिले.

 • Share this:
  शारजाह, 11 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर (IPL 2021 Eliminator) सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अंपायरवर चांगलाच संतापला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR vs RCB) सामन्यात अंपायर वीरेंद्र शर्मा (Umpire Virender Sharma) यांनी तीन चुकीचे निर्णय दिले, यानंतर विराटचा पारा चढला. अंपायर वीरेंद्र शर्मांच्या या निर्णयाचा आरसीबीला तोटा झाला नाही, कारण डीआरएस घेतल्यानंतर हे तिन्ही निर्णय बदलण्यात आले. हे तिन्ही निर्णय एलबीडब्ल्यूचे होते. वीरेंद्र शर्मा यांच्या तिसऱ्या चुकीच्या निर्णयानंतर विराट कोहली त्यांच्याजवळ गेला आणि दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) टाकलेला बॉल राहुल त्रिपाठीच्या (Rahul Tripathi) पायाला लागला, यानंतर आरसीबीने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी हे अपील फेटाळून लावल्यानंतर आरसीबीने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये राहुल त्रिपाठी आऊट असल्याचं निष्पन्न झालं. राहुल त्रिपाठी पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर विराट अंपायरसोबत चर्चा करण्यासाठी आला. या सामन्यात तिसऱ्यांदा चुकीचा निर्णय दिला गेल्याचं विराट अंपायरला सांगत असल्याचं त्याच्या हावभावांवरून दिसत होतं. एवढच नाही तर त्याने बॉलही आपटला. विराटच्या या कृतीमुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी पहिल्या दोन चुका आरसीबीची बॅटिंग सुरू असताना केल्या. शर्मा यांनी शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांना एलबीडब्ल्यू आऊट दिलं, पण दोघांच्याही बॅटला बॉल लागला होता. या दोघांनीही डीआरएस घेतला आणि रिप्लेमध्ये नॉट आऊट असल्याचं समोर आलं, त्यामुळे वीरेंद्र शर्मा यांच्यावर निर्णय बदलण्याची नामुष्की ओढावली. या दोन चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबीला दोन रनचं नुकसान झालं. आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत कोलकात्याला विजयासाठी 139 रनचं आव्हान दिलं. सुनिल नारायणने विराट कोहली, एबी डिव्हिलयर्स, ग्लेन मॅक्सेवल या दिग्गजांसह श्रीकर भरतचीही विकेट घेतली. कोलकात्याविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला. केकेआरने 139 रनचं हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पूर्ण केलं. याचसह आरसीबीचं यंदाच्या मोसमातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. तसंच विराट कोहलीची कॅप्टन म्हणून आरसीबीसाठीची ही अखेरची मॅच होती. एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकताच विराटने आपल्या कॅप्टन्सीला अलविदा केलं आहे. IPL 2021 : विराटच्या स्वप्नांचा चुराडा, आयपीएल ट्रॉफीशिवायच कॅप्टन्सीचा शेवट
  Published by:Shreyas
  First published: