Home /News /sport /

IPL 2021, RCB vs DC : पंत-हेटमायरची अर्धशतकं फुकट, बँगलोरचा दिल्लीवर रोमांचक विजय

IPL 2021, RCB vs DC : पंत-हेटमायरची अर्धशतकं फुकट, बँगलोरचा दिल्लीवर रोमांचक विजय

ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) यांची नाबाद अर्धशतकं पाण्यात गेली आहेत. या दोघांच्या शानदार कामगिरीनंतरही बँगलोरने दिल्लीवर (RCB vs DC) शेवटच्या बॉलवर 1 रनने रोमांचक विजय मिळवला.

    अहमदाबाद, 27 एप्रिल : ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) यांची नाबाद अर्धशतकं पाण्यात गेली आहेत. या दोघांच्या शानदार कामगिरीनंतरही बँगलोरने दिल्लीवर (RCB vs DC) शेवटच्या बॉलवर 1 रनने रोमांचक विजय मिळवला. दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 14 रनची गरज होती, पण मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) 12 रन देऊन बँगलोरचा विजय निश्चित केला. ऋषभ पंतने 48 बॉलमध्ये नाबाद 58 रन तर शिमरन हेटमायरने 25 बॉलमध्ये नाबाद 53 रन केले. बँगलोरकडून हर्षल पटेलला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज आणि काईल जेमिसनला एक-एक विकेट घेण्यात यश आलं. दिल्लीविरुद्धच्या या विजयासह बँगलोर पॉईंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर गेली आहे. विराटच्या टीमने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे दिल्लीची टीम 6 सामन्यात 4 विजय आणि 2 पराभवांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याआधी एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) एकाकी झुंजार खेळीनंतर बँगलोरने दिल्लीला (RCB vs DC) विजयासाठी 172 रनचं आव्हान दिलं. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बँगलोरला बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी बँगलोरला फार चांगली सुरुवात करुन दिली नाही. विराट 12 रनवर आणि पडिक्कल 17 रनवर आऊट झाले. सुरुवातीच्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि ग्लेन मॅक्सेवल (Glenn Maxwell) यांनी बँगलोरचा डाव सावरायला मदत केली, पण पाटीदार 31 आणि मॅक्सवेल 25 रनवर आऊट झाले, यानंतर एबी डिव्हिलियर्सने सगळी सूत्र स्वत:च्या हातात घेतली. एबीने 42 बॉलमध्ये नाबाद 75 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. दिल्लीकडून इशांत शर्मा, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा, अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात दिल्लीने टीममध्ये एक बदल केला आहे. आर.अश्विनऐवजी इशांत शर्माची निवड झाली आहे. कुटुंबातील व्यक्तींना कोरोना झाल्यामुळे अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर बँगलोरने टीममध्ये दोन बदल केले आहेत. सैनीऐवजी रजत पाटीदारला आणि डॅनियल ख्रिश्चनऐवजी डॅनियल सॅम्सला संधी देण्यात आली .
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, RCB

    पुढील बातम्या