मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, CSK vs RCB : 'सब कुछ सर जडेजा', बँगलोरचा मोसमातला पहिला पराभव

IPL 2021, CSK vs RCB : 'सब कुछ सर जडेजा', बँगलोरचा मोसमातला पहिला पराभव

IPL 2021 रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने बँगलोरचा (CSK vs RCB) या मोसमातला पहिला पराभव केला आहे. 28 बॉलमध्ये 62 रनची खेळी केल्यानंतर जडेजाने बॉलिंगमध्येही कमाल केली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 एप्रिल : रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने बँगलोरचा (CSK vs RCB) या मोसमातला पहिला पराभव केला आहे. 28 बॉलमध्ये 62 रनची खेळी केल्यानंतर जडेजाने बॉलिंगमध्येही कमाल केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन बँगलोरच्या 3 विकेट घेतल्या, तसंच एक ओव्हर मेडनही टाकली. चेन्नईच्या 192 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 122 रन करता आल्या, त्यामुळे त्यांचा तब्बल 69 रनने पराभव झाला. देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) सर्वाधिक 34 रन आणि ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 22 रन केले. चेन्नईकडून जडेजाशिवाय इम्रान ताहिरने 2 आणि सॅम कनर, शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

आरसीबीवर एवढा मोठा विजय मिळवल्यामुळे चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीलाही 5 सामने खेळून 4 विजय मिळवले, पण चांगल्या नेट रनरेटमुळे चेन्नई पहिल्या क्रमांकावर आणि बँगलोर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एकाच ओव्हरला काढलेल्या 37 रनच्या जोरावर चेन्नईने बँगलोरला (CSK vs RCB) विजयासाठी 192 रनचं आव्हान दिलं. हर्षल पटेलच्या (Harshal Patel) शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाने 5 सिक्स, एक फोर आणि एकदा दोन रन काढले, तसंच हर्षल पटेलने या ओव्हरमध्ये एक नो बॉलही टाकला. 19व्या ओव्हरपर्यंत चेन्नईचा स्कोअर 154/4 एवढा होता, पण 20वी ओव्हर संपल्यानंतर 191/4 झाला. तसंच हर्षल पटेलने त्याच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. शेवटची ओव्हर संपल्यानंतर हर्षलची कामगिरी 4 ओव्हरमध्ये 51 रन देऊन 3 विकेट अशी झाली. रविंद्र जडेजाने 28 बॉलमध्येच 221.43 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 62 रन केले, यात 5 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तर फाफ डुप्लेसिसने 50, ऋतुराज गायकवडाने 33, रैनाने 24, रायुडूने 14 रनची खेळी केली. बँगलोरकडून हर्षल पटेलला 3 आणि युझवेंद्र चहलला 1 विकेट मिळाली.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, RCB, Virat kohli