मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : विराटने ज्याला बाहेर केलं, त्यानेच ठोकले 161 रन

IPL 2021 : विराटने ज्याला बाहेर केलं, त्यानेच ठोकले 161 रन

आयपीएलच्या या मोसमाआधी (IPL 2021) प्रत्येक टीमने त्यांच्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) च्या रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनेही (RCB) 14 व्या मोसमासाठी 10 खेळाडूंना सोडून दिलं, यामध्ये ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dubey) चाही समावेश आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 जानेवारी : आयपीएलच्या या मोसमाआधी (IPL 2021) प्रत्येक टीमने त्यांच्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) च्या रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनेही (RCB) 14 व्या मोसमासाठी 10 खेळाडूंना सोडून दिलं, यामध्ये ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dubey) चाही समावेश आहे. शिवम दुबेला आयपीएल 2020 मध्ये खास कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे विराटच्या टीमने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. पण आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी शिवम दुबे शानदार फॉर्ममध्ये आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली, पण शिवम दुबेने धमाका केला.

शिवम दुबेने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही चांगली कामगिरी केली. दुबेने मुंबईकडून खेळताना सर्वाधिक 161 रन केले, यामध्ये त्याची सरासरी 40.25 रनची तर स्ट्राईक रेट 140 च्या आसपास होता. या स्पर्धेत त्याने 10 सिक्स आणि 10 फोर लगावल्या, यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. दुबेने 5 मॅचमध्ये 7.50 च्या इकोनॉमी रेटने 3 विकेटही घेतल्या. पण शिवम दुबेच्या या कामगिरीचा मुंबईला आणि त्याला स्वत:लाही फायदा झाला नाही.

शिवम दुबेची आयपीएलमधली कामगिरी

आयपीएल 2019 मध्ये शिवम दुबेला बैंगलोरने 5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मुंबईच्या या खेळाडूची बेस प्राईज फक्त 20 लाख रुपये होती, पण त्याच्या आक्रमक बॅटिंग आणि बॉलिंगमुळे लिलावात टीम तुटून पडल्या. पण मैदानामध्ये दुबेला त्याची प्रतिभा दाखवता आली नाही. शिवम दुबेने आयपीएलमध्ये 15 मॅचमध्ये 16.90 च्या सरासरीने 169 रन केले. मागच्या मोसमात त्याला 11 मॅचमध्ये खेळायची संधी मिळाली, पण त्याला 129 रनच करता आले. बॉलिंगमध्येही त्याने 8.11 च्या इकोनॉमी रेटने फक्त 4 विकेट घेतल्या.

First published: