IPL 2021 : पॉईंट्स टेबल, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, आयपीएलमध्ये RCB चा दबदबा

IPL 2021 : पॉईंट्स टेबल, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, आयपीएलमध्ये RCB चा दबदबा

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे.

  • Share this:

चेन्नई, 18 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. यावर्षातल्या आपल्या तिसऱ्या सामन्यात आरसीबीने कोलकात्याचा (KKR) 38 रनने पराभव केला. बँगलोरचा या मोसमातला तीन सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे, त्यामुळे 6 पॉईंट्ससह टीम पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल इतिहासात बँगलोर तीनवेळा फायनलमध्ये पोहोचली आहे, पण एकदाही त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आयपीएलमध्ये आरसीबीने कधीच सुरुवातीच्या तीन मॅच जिंकल्या नव्हत्या.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बँगलोरच्या खेळाडूंकडेच ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि पर्पल कॅप (Purple Cap) आहे. ग्लेन मॅक्सेवलने (Glenn Maxwell) तीन पैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतक केलं आहे. या मोसमात 176 रनसह मॅक्सवेल सध्या सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे, त्यामुळे ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. केकेआरविरुद्ध मॅक्सवेलने 78 रन केले. या मोसमात त्याने 149 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत, यात 17 फोर आणि 8 सिक्सचा समावेश आहे.

दुसरीकडे आरसीबीचाच फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) याच्याकडे पर्पल कॅप (Purple Cap) आहे. तीन सामन्यांमध्ये त्याने 9 विकेट घेतल्या. मुंबईविरुद्ध त्याने 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तर कोलकात्याविरुद्ध त्याला 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 2 विकेट मिळाल्या. हर्षल पटेलने 3 सामन्यांमध्ये फक्त 5.57 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे, तर त्याचा स्ट्राईक रेट फक्त 8 चा आहे.

रविवारी चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये आरसीबीने केकेआरचा 38 रनने पराभव केला. पहिले बॅटिंग करताना बँगलोरने 204 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 8 विकेट गमावून 166 रनच करता आले. बँगलोरकडून एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिव्हिलियर्सने 34 बॉलमध्ये नाबाद 76 रनची खेळी केली, तर मॅक्सवेलने 49 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली. बॉलिंगमध्ये काईल जेमिसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 31 रन केले.

Published by: Shreyas
First published: April 18, 2021, 9:12 PM IST

ताज्या बातम्या