मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : RCB च्या हर्षल पटेलचा पराक्रम, बुमराहला मागे टाकत घडवला इतिहास

IPL 2021 : RCB च्या हर्षल पटेलचा पराक्रम, बुमराहला मागे टाकत घडवला इतिहास

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) मोसमात आरसीबीचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) मोसमात आरसीबीचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) मोसमात आरसीबीचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 6 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या (IPL 2021) मोसमात आरसीबीचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH vs RCB) सामन्यात हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याचसह हर्षल पटेलच्या या मोसमात 29 विकेट झाल्या आहेत. 13 सामन्यांमध्ये 14 च्या सरासरीने आणि 8.40 च्या इकोनॉमी रेटने हर्षल पटेलने ही कामगिरी केली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केलेल्या या कामगिरीसह हर्षल पटेलच्या नावावर नवा विक्रम झाला आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय होण्याचा पराक्रम हर्षल पटेलने केला आहे. याआधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2020 साली 27 विकेट घेतल्या होत्या, तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) 2017 साली 26 विकेट मिळाल्या होत्या.

आयपीएल इतिहासात आरसीबीकडून एखाद्या बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 2015 साली आरसीबीकडून खेळताना 23 विकेट घेतल्या होत्या.

हर्षल पटेलने याआधी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (RCB vs MI) सामन्यात हॅट्रिक घेतली होती. आरसीबीकडून हॅट्रिक घेणारा तो फक्त तिसरा बॉलर आहे. याचसह त्याने एकदा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे.

ब्राव्होचं रेकॉर्ड निशाण्यावर

आयपीएलला 2008 साली सुरुवात झाली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम चेन्नईच्या (CSK) ड्वॅन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) नावावर आहे. 2013 साली ब्राव्होने हा विक्रम केला होता. दिल्लीच्या कागिसो रबाडाने 2020 साली 30 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये हर्षल पटेल तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्राव्होचा विक्रम मोडण्यासाठी पटेलला 4 विकेटची तर रबाडाला मागे टाकण्यासाठी 2 विकेटची गरज आहे. आरसीबीच्या टीमची लीग स्टेजमधली एक मॅच शिल्लक आहे, तसंच ते प्ले-ऑफमध्ये आधीच क्वालिफाय झाले आहेत. त्यामुळे हर्षल पटेलला हा विक्रम मोडण्यासाठी कमीत कमी आणखी दोन मॅच तरी मिळणार आहेत.

First published:

Tags: IPL 2021, RCB