मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : विराटची RCB प्ले-ऑफच्या आणखी जवळ, राजस्थानचं 'स्वप्न' भंगणार!

IPL 2021 : विराटची RCB प्ले-ऑफच्या आणखी जवळ, राजस्थानचं 'स्वप्न' भंगणार!

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बँगलोरचा (RCB vs RR) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बँगलोरचा (RCB vs RR) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बँगलोरचा (RCB vs RR) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

दुबई, 29 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बँगलोरचा (RCB vs RR) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. राजस्थानने ठेवलेल्या 150 रनच्या आव्हानाचा पाठलाग बँगलोरने 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून केला. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 30 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. तर श्रीकर भरत (S Bharat) 35 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांच्या ओपनिंग जोडीने बँगलोरला 48 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. विराट 25 रनवर आणि पडिक्कल 22 रनवर माघारी परतले. राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमानला 2 विकेट मिळाल्या.

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले राजस्थानला बॅटिंगला बोलावलं. यानंतर एव्हिन लुईस (Evin Lewis) आणि यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) ओपनिंग जोडीने राजस्थानला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोघांनी 8.2 ओव्हरमध्येच 77 रन केले, पण त्यानंतर राजस्थानची बॅटिंग गडगडली. लुईस 37 बॉलमध्ये 58 रन करून आऊट झाला, तर यशस्वी जयस्वालला 22 बॉलमध्ये 21 रन करता आले. बँगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल आणि शाहबाज अहमदला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. डॅनियल ख्रिश्चन आणि जॉर्ज गार्टोन यानेही 1-1 विकेट घेतली.

आरसीबी प्ले-ऑफच्या जवळ

राजस्थानविरुद्धच्या या विजयासह आरसीबी प्ले-ऑफच्या (IPL Play Off) आणखी जवळ पोहोचली आहे. बँगलोरने यावर्षी 11 पैकी 7 मॅच जिंकल्या तर 4 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये विराटची टीम 14 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तर दुसरीकडे राजस्थानचं मात्र प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न आणखी धूसर झालं आहे. राजस्थानने 11 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम 8 पॉईंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थानला उरलेले तिन्ही सामने जिंकावे लागतील, सोबतच त्यांना इतर टीमच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Rajasthan Royals, RCB