• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : यंदाही मुंबईची खराब सुरुवात, रोमांचक सामन्यात RCBचा विजय

IPL 2021 : यंदाही मुंबईची खराब सुरुवात, रोमांचक सामन्यात RCBचा विजय

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरूवात खराब झाली आहे. या वर्षाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) मुंबईचा 2 विकेटने पराभव केला आहे.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरूवात खराब झाली आहे. या वर्षाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) मुंबईचा 2 विकेटने पराभव केला आहे. रोमांचक अशा या सामन्यात बँगलोरला शेवटच्या बॉलरवर विजयासाठी 1 रनची गरज होती. मुंबईने ठेवलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलरोची सुरूवात चांगली झाली. 4.2 ओव्हरमध्ये 36 रनवर वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) रुपात बँगलोरला पहिला धक्का लागला. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डिव्हिलियर्स (AB De Villiers) यांनी चांगली बॅटिंग केली पण तिघंही चुकीच्या वेळी आऊट झाले. एबी डिव्हिलियर्सने 27 बॉलमध्ये सर्वाधिक 48 रन केले, तर मॅक्सवेलने 39 रनची आणि विराट कोहलीने 33 रनची खेळी केली. मुंबईकडून बुमराह (Jaspirt Bumrah) आणि मार्को जेनसनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर ट्रेन्ट बोल्ट आणि कृणाल पांड्याला 1 विकेट घेण्यात यश आलं. 2013 पासून लागोपाठ 9 वर्ष मुंबईने आयपीएलचे पहिले सामने गमावले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) बॅटिंग गडगडली. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले मुंबईला बॅटिंगला बोलावलं, यानंतर मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रन केले. बँगलोरच्या हर्षल पटेलने (Harshal Patel) 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर काईल जेमिसन आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल हा पहिलाच बॉलर ठरला आहे. मुंबईकडून या सामन्यात क्रिस लीनने सर्वाधिक 49 रन केले, तर सूर्यकुमार यादवने 31 आणि इशान किशनने 28 रनची खेळी केली. पाकिस्तानविरुद्धची सीरिज खेळून आलेला दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) अजूनही आयसोलेशनमध्ये आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी क्रिस लीनला (Chris Lynn) संधी देण्यात आली आहे. क्रिस लीनचा मुंबई इंडियन्ससाठीचा हा पहिलाच सामना होता. आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्स ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, तर विराट कोहलीच्या बँगलोरला अजूनपर्यंत एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबईने आयपीएल जिंकली आहे. आता विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी रोहितची टीम यंदा मैदानात उतरली आहे.
  Published by:Shreyas
  First published: