IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलवरून RCB आणि पंजाब किंग्स सोशल मीडियावर भिडले

IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलवरून RCB आणि पंजाब किंग्स सोशल मीडियावर भिडले

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs RCB) शेवटच्या बॉलवर पराभव केला. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) छोटी पण महत्त्वाची खेळी केली. यानंतर आरसीबी आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात ट्विटरवर सामना रंगला.

  • Share this:

चेन्नई, 10 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians vs RCB) शेवटच्या बॉलवर पराभव केला. हर्षल पटेल (Harshal Patel) आणि एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) यांनी आरसीबीच्या या विजयात मोलाचं योगदान दिलं, पण ग्लेन मॅक्सवेलनेही (Glenn Maxwell) छोटी पण महत्त्वाची खेळी केली. मागच्या मोसमात एकही सिक्स मारू न शकणाऱ्या मॅक्सवेलने 28 बॉलमध्ये 39 रन केले. यात 2 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. मॅक्सवेलच्या या इनिंगनंतर आरसीबीने पंजाब किंग्सला (Punjab Kings) ट्रोल केलं.

मॅक्सवेलच्या या महत्त्वाच्या खेळीनंतर आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याला रिलिज केल्याबद्दल पंजाब किंग्सचे आभार मानले. आरसीबीच्या या ट्वीटवर प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्सनेही प्रत्युत्तर दिलं. या दोघांचं ट्विटरवरचं भिडणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं.

आरसीबीने मॅक्सवेलला रिलीज केल्याबद्दल आभार मानल्यानंतर पंजाबनेही प्रत्युत्तर देत उलट आरसीबीचेच आभार मानले. क्रिस गेल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, सरफराज अहमद आणि मनदीप सिंग हे खेळाडू आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद, असं ट्वीट पंजाबने केलं.

मागच्या मोसमात मॅक्सवेल सुपर फ्लॉप

आयपीएलच्या मागच्या मोसमात पंजाबकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेल सुपर फ्लॉप ठरला. पंजाबने मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण 13 सामन्यांमध्ये त्याने 15.42 च्या सरासरीने 108 रन केले. मागच्यावर्षी त्याला एकही सिक्स मारता आली नव्हती. पण या खराब कामगिरीनंतरही यावेळी आरसीबीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि 14.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. यावर्षीच्या पहिल्याच सामन्यानंतर आपण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत मॅक्सवेलने दिले आहेत.

Published by: Shreyas
First published: April 10, 2021, 5:36 PM IST

ताज्या बातम्या