मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 'हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे', राजस्थानने स्वत:चाच नाही तर इतर दोघांचाही 'कार्यक्रम' केला

IPL 2021 : 'हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे', राजस्थानने स्वत:चाच नाही तर इतर दोघांचाही 'कार्यक्रम' केला

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या प्ले-ऑफच्या (IPL Play Off) चार टीम जवळपास निश्चित झाल्या आहेत. दिल्ली (DC), चेन्नई (CSK), बँगलोर (RCB) आणि कोलकाता (KKR) या चार टीम प्ले-ऑफमध्ये खेळताना दिसतील.

    मुंबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या प्ले-ऑफच्या (IPL Play Off) चार टीम जवळपास निश्चित झाल्या आहेत. दिल्ली (DC), चेन्नई (CSK), बँगलोर (RCB) आणि कोलकाता (KKR) या चार टीम प्ले-ऑफमध्ये खेळताना दिसतील. आयपीएलच्या लीग स्टेजचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे, पण गुरूवारपर्यंत प्ले-ऑफच्या शर्यतीत कोलकाता (KKR), मुंबई (Mumbai Indians), पंजाब (Punjab Kings) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या टीम होत्या. कोलकात्याने राजस्थानचा 85 रनने पराभव केल्यामुळे फक्त राजस्थानच नाही तर पंजाब आणि मुंबईच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. सनरायजर्स हैदराबादची टीम याआधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली होती. राजस्थान रॉयल्सने कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवला असता तर मुंबईने शुक्रवारी हैदराबादचा पराभव करून प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला असता, पण आता राजस्थानचाच पराभव झाल्यामुळे मुंबईचंही प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 14 पैकी 7 मॅच जिंकल्या तर 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. केकेआरच्या खात्यात 14 पॉईंट्स असले तरी त्यांचा नेट रन रेट +0.587 एवढा आहे. जो इतर टीमच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआरची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब पाचव्या, मुंबई सहाव्या आणि राजस्थान सातव्या क्रमांकावर आहेत. पंजाब आणि राजस्थानच्या सगळ्या मॅच संपल्या आहेत, तर मुंबईचा अजून एक सामना शिल्लक आहे. पंजाबने 14 पैकी 6 मॅच जिंकल्या तर राजस्थानला 14 पैकी फक्त 5 सामने जिंकता आले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians, Punjab kings, Rajasthan Royals

    पुढील बातम्या