Home /News /sport /

IPL 2021, RR vs RCB : पडिक्कलचं धमाकेदार शतक, 'विराट' पार्टनरशीपमुळे बँगलोर अजिंक्य

IPL 2021, RR vs RCB : पडिक्कलचं धमाकेदार शतक, 'विराट' पार्टनरशीपमुळे बँगलोर अजिंक्य

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी अजूनही अजिंक्यच आहे. देवदत्त पडिक्कलचं (Devdutt Padikkal) नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा (RCB vs Rajasthan Royals) 10 विकेटने पराभव केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी अजूनही अजिंक्यच आहे. देवदत्त पडिक्कलचं (Devdutt Padikkal) नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा (RCB vs Rajasthan Royals) 10 विकेटने पराभव केला. राजस्थानने ठेवलेलं 179 रनचं आव्हान बँगलोरने एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पडिक्कलने 52 बॉलमध्ये नाबाद 101 रन तर विराट कोहलीने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले. पडिक्कलच्या खेळीमध्ये 6 सिक्स आणि 11 फोरचा समावेश होता. विराटने 3 सिक्स आणि 6 फोर मारले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बँगलोरने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. याचसोबत पॉईंट्स टेबलमध्येही ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर राजस्थानची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 4 पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर 3 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करत राजस्थानच्या टीमने 9 विकेट्स गमावत 177 रन्स केल्या आणि आरसीबीसला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं. राजस्थान रॉयल्सकडून शिवम दुबे याने सर्वाधिक रन्स केले. शिवम दुबे याने 46 रन्स, राहुल तेवतियाने 40 रन्सची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही मोठा स्कोअर उभा करता आला नाही. रियान पराग याने 25 रन्स, संजू सॅमसनने 21 रन्स केले. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन-तीन  विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज याने चार ओव्हर्समध्ये 27 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने चार ओव्हर्समध्ये 47 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर केन रिचर्डसन, काईल जेमिसन आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. या सामन्यात विराटने टीममध्ये एकच बदल केला आहे. रजत पाटीदारच्याऐवजी (Rajat Patidar) केन रिचर्डसनला (Kane Richardson) संधी देण्यात आली आहे, तर राजस्थानने जयदेव उनाडकटच्याऐवजी (Jaydev Unadkat) श्रेयस गोपाळला (Shreyas Gopal) निवडलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Rajasthan Royals, RCB, Sanju samson, Virat kohli

    पुढील बातम्या