IPL 2021 : राजस्थानच्या पराभवानंतर रियान परागचे अपशब्द, नंतर डिलीट केलं ट्वीट

IPL 2021 : राजस्थानच्या पराभवानंतर रियान परागचे अपशब्द, नंतर डिलीट केलं ट्वीट

आयपीएलच्या (IPL 2021) अत्यंत रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा (Punjab Kings vs Rajasthan Royals) पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानचा ऑलराऊंडर रियान परागने (Riyan Parag) अपशब्द वापरत एक ट्वीट केलं.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) अत्यंत रोमांचक अशा सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा (Punjab Kings vs Rajasthan Royals) पराभव केला. 222 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 217 रनच करता आले. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) वादळी शतकानंतरही राजस्थानला हा सामना जिंकता आला नाही. या पराभवानंतर राजस्थानचा ऑलराऊंडर रियान परागने (Riyan Parag) अपशब्द वापरत एक ट्वीट केलं, पण स्वत:ची चूक लक्षात येताच त्याने हे ट्वीट डिलीट करून टाकलं.

राजस्थानच्या पराभवानंतर रियान परागने स्वत:वरच प्रश्न उपस्थित केले, पण काही मिनिटांच्या आत त्याने हे ट्वीट डिलीट केलं, पण त्याच्या या ट्वीटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मॅचच्या शेवटच्या क्षणांमध्ये रियान पराग आऊट झाला. 11 बॉलमध्ये 25 रनची खेळी करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याच्या या खेळीमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. 17 व्या ओव्हरमध्ये शमीच्या (Mohammad Shami) बॉलिंगवर विकेट कीपर केएल राहुलकडे (KL Rahul) परागने कॅच दिला. पराग आऊट झाल्यानंतर राहुल तेवतिया (Rahul Tewatia) 4 बॉलमध्ये 2 रन करून आऊट झाला. आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू क्रिस मॉरिसही (Chris Morris) 4 बॉलमध्ये 2 रनच करू शकला. रियान पराग शेवटपर्यंत क्रीजवर असता, तर मॅचचा निकाल राजस्थानच्या बाजूने लागू शकत होता.

राजस्थानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार संजू सॅमसनने एकाकी संघर्ष केला. कर्णधार म्हणून आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या संजूने 63 बॉलमध्ये 119 रन ठोकले. शेवटच्या बॉलवर राजस्थानला 5 रनची गरज होती, पण अर्शदीपच्या बॉलिंगवर दीपक हुडाने सॅमसनचा कॅच पकडला आणि पंजाबचा 4 रनने विजय झाला.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 6:39 PM IST

ताज्या बातम्या