मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : बिहू डान्सनंतर आता रियान परागचं 'सेल्फी सेलिब्रेशन'

IPL 2021 : बिहू डान्सनंतर आता रियान परागचं 'सेल्फी सेलिब्रेशन'

IPL 2021 कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये राजस्थानचे (KKR vs Rajasthan Royals) खेळाडू रियान पराग (Riyan Parag) आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांनी सेल्फी सेलिब्रेशन केलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 एप्रिल : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) भारताच्या नवोदित क्रिकेटपटूंना दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळते. क्रिकेटसोबतच आयपीएल वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी चर्चेत असते. कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येत नाही, तसंच खेळाडूंच्या मॅचनंतरच्या पार्टीही बंद झाल्या आहेत. या पार्ट्यांमध्ये खेळाडूंना सेलिब्रेशन करता येत नसलं, तरी ते मैदानामध्ये मात्र याची कसर भरून काढत आहेत.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये राजस्थानचे (KKR vs Rajasthan Royals) खेळाडू रियान पराग (Riyan Parag) आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांनी सेल्फी सेलिब्रेशन केलं. कोलकात्याच्या दोन विकेट पडल्यानंतर बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या रियान पराग आणि राहुल तेवतियांनी बॉल हातात ठेवून सेल्फी काढत असल्याची नक्कल केली.

याआधी आयपीएलच्या मागच्या मोसमात रियान परागच्या बिहू डान्सचं सेलिब्रेशनही व्हायरल झालं होतं. आसामचं लोकनृत्य असलेला बिहू डान्सचं सेलिब्रेशन राजस्थानच्या इतर परदेशी खेळाडूंनीही केलं होतं.

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानच्या बॉलर्सनी चमकदार कामगिरी केली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थानने कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 133 रनवर रोखलं. क्रिस मॉरिसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आणि जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्तफिजूर रहमानला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. कोलकात्याकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 36 रन तर नितीश राणाने 22 रन आणि दिनेश कार्तिकने 25 रन केले.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Rajasthan Royals