Home /News /sport /

IPL 2021 : 2.40 कोटींचा मिस्ट्री स्पिनर डिप्रेशनमध्ये, एका फोनने बदललं आयुष्य

IPL 2021 : 2.40 कोटींचा मिस्ट्री स्पिनर डिप्रेशनमध्ये, एका फोनने बदललं आयुष्य

2015 सालच्या आयपीएलआधी (IPL) पंजाबने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या बॉलरला फार कोणी ओळखत नव्हतं. केसी करियप्पा (KC Cariappa) याला मिस्ट्री स्पिनर म्हणून संबोधलं जायचं.

    मुंबई, 8 सप्टेंबर : 2015 सालच्या आयपीएलआधी (IPL) पंजाबने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या बॉलरला फार कोणी ओळखत नव्हतं. केसी करियप्पा (KC Cariappa) याला मिस्ट्री स्पिनर म्हणून संबोधलं जायचं, पण त्याची कामगिरी फार चांगली झाली नाही. 6 वर्षांमध्ये त्याला फक्त 29 टी-20 मॅच खेळण्याची संधी मिळाली. पंजाबने त्याला टीममधून बाहेर केलं आणि आता तो राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमचा भाग आहे. करियप्पा सध्या युएईमध्ये आहे आणि आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडची तयारी करतोय. पंजाब किंग्सकडून खेळल्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये गेलो होतो, पण एका फोनमुळे माझं आयुष्य बदलल्याचं करियप्पाने सांगितलं. 'मी बंगळुरूमध्ये असाच फिरायचो. माझ्या फिटनेसवरही परिणाम झाला होता. तेव्हा अचानक मला जुबिन सरांचा फोन आला. त्यांनी मला आयपीएल ट्रायल खेळायला बोलावलं. मला कोणीतरी ट्रायलला बोलवत आहे, हे पाहून मी स्तब्ध झालो, कारण मी जवळपास एक वर्ष गमावलं होतं. माझं वजनही 95 किलो झालं होतं. मी तिकडे गेलो आणि चांगली बॉलिंग केली,' असं करियप्पा म्हणाला. 'मी 2015 पासून तुला बघत आहे, तुझी समस्या काय आहे, असं मला जुबिन सरांनी विचारलं. फिटनेसबाबत काही अडचणी आहेत का. मला तुझी बॉलिंग आवडते, पण तुला फिटनेस नीट करावा लागेल, असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मला प्रेरणा मिळाली आणि फिटनेस मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी जुबिन सर आणि राजस्थान रॉयल्सचे आभार मानतो,' अशी प्रतिक्रिया करियप्पाने दिली. येणारा आयपीएलचा मोसम माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. याचा वापर भारतीय टीममध्ये जागा मिळवण्यासाठी करणार असल्याचं करियप्पाने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या