मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : इंग्लंडमध्ये 48 सिक्स मारणारा वादळी बॅट्समन आयपीएलमध्ये धमाका करणार!

IPL 2021 : इंग्लंडमध्ये 48 सिक्स मारणारा वादळी बॅट्समन आयपीएलमध्ये धमाका करणार!

इंग्लंडमध्ये धमाका करणाऱ्या खेळाडूचं आयपीएलमध्ये पदार्पण

इंग्लंडमध्ये धमाका करणाऱ्या खेळाडूचं आयपीएलमध्ये पदार्पण

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरूवात होणार आहे, त्याआधी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्यांच्या टीममध्ये आक्रमक खेळाडूला स्थान दिलं आहे.

    मुंबई, 21 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरूवात होणार आहे, त्याआधी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्यांच्या टीममध्ये आक्रमक खेळाडूला स्थान दिलं आहे. न्यूझीलंडचा विकेट कीपर असलेल्या ग्लेन फिलिप्ससोबत (Glenn Phillips) राजस्थानने करार केला आहे. ग्लेन फिलिप्स हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ग्लेन फिलिप्सला जॉस बटलरऐवजी (Jos Buttler) राजस्थानच्या टीममध्ये स्थान मिळालं आहे. जॉस बटलर दुसऱ्यांदा बाप होणार असल्यामुळे त्याने आयपीएलच्या उरलेल्या मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा मोठा धक्का आहे, कारण बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हे त्यांचे प्रमुख खेळाडू आधीच आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. ग्लेन फिलिप्स सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. फिलिप्सच्या वादळी बॅटिंगची चर्चा वर्ल्ड क्रिकेटमध्ये होत आहे. फिलिप्सने इंग्लंडमधल्या टी-20 ब्लास्ट (T20 Blast) आणि द हंड्रेडमध्ये (The Hundred) आक्रमक बॅटिंग केली आहे. या दोन्ही स्पर्धांच्या 20 मॅचमध्ये त्याने 48 सिक्सच्या मदतीने 714 रन केले. टी-20 ब्लास्टमध्ये ग्लूस्टरशरकडून खेळताना फिलिप्सने 12 मॅचमध्ये 55.55 च्या सरासरीने 500 रन ठोकले. त्याचा स्ट्राईक रेटही 163.39 एवढा होता. यादरम्यान त्याने 36 सिक्सही मारल्या. द हंड्रेडमध्ये फिलिप्स वेल्श फायरकडून खेळतो. या स्पर्धेत त्याने 8 मॅचमध्ये 35.66 च्या सरासरीने 214 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट 146.57 एवढा आहे, तसंच त्याने 12 सिक्सही लगावले. 24 वर्षांच्या ग्लेन फिलिप्सची न्यूझीलंडच्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीममध्ये निवड झाली आहे, त्याआधी आयपीएलमध्ये संधी मिळाल्यामुळे फिलिप्सचा फायदा होणार आहे. ग्लेन फिलिप्सने टी-20 क्रिकेटमध्ये 4 शतकं केली आहेत. राजस्थान रॉयल्सलाही त्याच्याकडून शतकाची अपेक्षा असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021

    पुढील बातम्या