• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : जलेबी, फाफडा आणि तरक मेहता! राजस्थान रॉयल्सच्या PHOTO ला सकारियाचं भन्नाट उत्तर

IPL 2021 : जलेबी, फाफडा आणि तरक मेहता! राजस्थान रॉयल्सच्या PHOTO ला सकारियाचं भन्नाट उत्तर

राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) सोशल मीडिया टीम त्यांच्या हटके पोस्टमुळे लोकप्रिय झाली आहे. राजस्थानकडून खेळणाऱ्या चेतन सकारियानेही (Chetan Sakariya) सोशल मीडिया टीमच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट : राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) सोशल मीडिया टीम त्यांच्या हटके पोस्टमुळे लोकप्रिय झाली आहे. राजस्थानकडून खेळणाऱ्या चेतन सकारियानेही (Chetan Sakariya) सोशल मीडिया टीमच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. रक्षाबंधननिमित्त राजस्थान रॉयल्सने चेतन सकारियाचा जिलेबी आणि फाफड्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला. गुजरातचा असलेल्या सकारियाच्या राज्यात जिलेबी आणि फाफडा लोकप्रिय आहे, त्यामुळे राजस्थानने हा फोटो सोशल मीडियावर शेयर केला. सकारियाच्या या फोटोसोबत राजस्थान रॉयल्सने त्याला घरचा पत्ता विचारला. राजस्थान रॉयल्सच्या या ट्वीटवर चेतन सकारियानेही तेवढंच भन्नाट उत्तर दिलं. पाऊडर गल्ली, गोकूळधाम सोसायटी, असा पत्ता सकारियाने दिला. तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय हिंदी सीरियलमध्ये रहिवासी या सोसायटीमध्ये राहतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या सीरियलमधलं मुख्य पात्र जेठालाल चंपकलाल गाडा यांची भूमिका दिलीप जोशी यांनी केली आहे. सीरियलमध्येही जेठालाल यांचं जलेबी आणि फाफड्याबद्दलचं प्रेम अनेकवेळा दाखवण्यात आलं आहे. सौराष्ट्रचा फास्ट बॉलर असलेल्या 23 वर्षांच्या चेतन सकारियाने यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पहिल्या काही सामन्यांमध्येच सकारियाकडे भविष्यातला सुपर स्टार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. यानंतर लगेच त्याची निवड टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी झाली. या दौऱ्यात सकारिया एक वनडे आणि 2 टी-20 मॅच खेळला. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या (IPL 2021) उरलेल्या मॅचना युएईमध्ये सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची सकारिया आणि राजस्थानच्या टीमची अपेक्षा असेल.
  Published by:Shreyas
  First published: