IPL 2021: राजस्‍थान रॉयल्‍सला मोठा झटका, थकव्यामुळे या इंग्लिश खेळाडूची स्पर्धेतून माघार

IPL 2021: राजस्‍थान रॉयल्‍सला मोठा झटका, थकव्यामुळे या इंग्लिश खेळाडूची स्पर्धेतून माघार

IPL 2021: या हंगामात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) अजूनपर्यंत आपली कामगिरी उंचवता आलेली नाही त्यातच त्यांना एकामागे एक झटके बसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: आयपीएल टी-20 क्रिकेट (IPL 2021) स्पर्धेत जसजसे सामने होत आहेत तसतशी रंगत वाढू लागली आहे. राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) अजूनपर्यंत आपली कामगिरी उंचवता आलेली नाही त्यातच त्यांना एकामागे एक झटके बसत आहेत. इंग्लिश ऑलराउंडर बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाल्याने या सीझनमधून बाहेर पडला होता. पण आता राजस्थानला आणखी एक झटका बसला आहे. आणखी एका इंग्लिश खेळाडूने यावर्षीच्या आयपीएल सीझनमधून माघार घेतली आहे. लियाम लिव्हिंगस्टोन याला सतत जैविक सुरक्षित (Bio Bubble) वातावरणात राहिल्यामुळे खूप थकवा जाणवत आहे त्यामुळे त्याने सीझनमधूनच माघार घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनची (Sanju Samson) चिंता अजून वाढली आहे.

कोरोना महामारी (Coronavirus Pandemic) सुरू असल्याने क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना जैविक सुरक्षित वातावरणात रहावं लागतं. लियाम गेल्या वर्षभरापासून विविध क्रिकेट स्पर्धांच्या निमित्ताने जैविक सुरक्षित वातावरणात रहात होता त्यामुळे त्याला प्रचंड थकवा आला होता. मग त्यानी माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि तो इंग्लंडला रवाना झाला. फ्रँचायजीने लियामच्या निर्णयाला दुजोरा आणि पाठिंबा दिला असून आम्ही भविष्यातही या खेळाडूसोबत राहू असं म्हटलं आहे.

(हे वाचा-IPL 2021: अमित मिश्राने रचला नवा रेकॉर्ड, तर 'या' विक्रमापासून केवळ 7 विकेट्स द)

दीर्घकाळ बायोबबल मध्ये असल्याने थकवा

राजस्थान फ्रँचायजीने ट्वीट केलं आहे की लियाम लिव्हिंगस्टोन सोमवारी मध्यरात्री त्यांच्या मायदेशी (इंग्लंड) परतला आहे. गेल्या वर्षभरात जैविक सुरक्षित वातावरणात राहिल्याने थकवा आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. आम्ही त्याची भावना समजू शकतो आणि त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्यांना कायम पाठिंबा देत राहू.

या आधी बेन स्टोक्सपण इंग्लंडला परतला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात ख्रिस गेलचा कॅच पकडण्यासाठी बेन स्टोक्सने डाइव्ह मारली होती. त्या वेळी त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीचं हाड फ्रॅक्चर झालं होतं. त्यावर लीड्समध्ये सर्जरी होणार होती म्हणून स्टोक्सला अनिश्चेनेच आपला संघ सोडून  इंग्लंडला परतावं लागलं. आता स्टोक्स जवळजवळ 12 आठवडे खेळू शकणार नाही. स्टोक्स आयपीएलमध्ये खेळणार नाहीच पण जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तसंच 23 जून ते 4 जुलैदरम्यान श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि वनडे क्रिकेट मालिकांमध्येही खेळू शकणार नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 21, 2021, 4:16 PM IST

ताज्या बातम्या