मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : Play Off मध्ये पोहोचण्यासाठी फक्त विजय चालणार नाही, चारही टीमना करावं लागणार हे काम

IPL 2021 : Play Off मध्ये पोहोचण्यासाठी फक्त विजय चालणार नाही, चारही टीमना करावं लागणार हे काम

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अखेरच्या आठवड्यात येऊन ठेपलं आहे, पण प्ले-ऑफच्या चौथ्या स्थानासाठीची रेस अजूनही कायम आहे. चेन्नई (CSK), दिल्ली (DC) आणि बँगलोरच्या (RCB) टीमने आधीच प्ले-ऑफ गाठलं आहे, तर कोलकाता, राजस्थान, पंजाब आणि मुंबई यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) आता अखेरच्या आठवड्यात येऊन ठेपलं आहे, पण प्ले-ऑफच्या चौथ्या स्थानासाठीची रेस अजूनही कायम आहे. चेन्नई (CSK), दिल्ली (DC) आणि बँगलोरच्या (RCB) टीमने आधीच प्ले-ऑफ गाठलं आहे, तर कोलकाता, राजस्थान, पंजाब आणि मुंबई यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा आहे. कोलकात्याचे (KKR) 13 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत, त्यामुळे ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर पंजाब (PBKS), राजस्थान (RR) आणि मुंबई (Mumbai Indians) 10-10 पॉईंट्ससह पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

मुंबई आणि राजस्थान यांच्यात आज करो या मरोचा मुकाबला होणार आहे, कारण दोन्ही टीमसाठी समिकरण एकसारखं आहे. दोन्ही टीमना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त विजयच गरजेचा नाही, तर मॅचही मोठ्या फरकाने जिंकावी लागणार आहे. तरचं प्ले-ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता निर्माण होईल.

राजस्थानचा नेट रन रेट -0.337 आहे, तर मुंबईचा -0.453 एवढा झाला आहे. 10 पॉईंट्सवर असणाऱ्या टीममध्ये मुंबईचा नेट रन रेट सगळ्यात खराब आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे मुंबईचा रन रेट आणखी खराब झाला. आजचा सामना हरणारी टीम प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर जाईल, पण विजय मिळवणाऱ्या टीमला प्ले-ऑफमध्ये जाणं सोपं नसेल, कारण कोलकात्याचा पुढच्या सामन्यात विजय झाला तर ते 14 पॉईंट्सपर्यंत जातील, तसंच त्यांचा नेट रन रेट +0.294 एवढा आहे.

राजस्थान आणि मुंबईसाठी पुढचा प्रवास फारच खडतर झाला आहे. कोलकात्याचा पुढचा सामना राजस्थानविरुद्ध आहे, तर मुंबई शेवटची मॅच हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. मुंबईने उरलेले दोन्ही सामने जिंकले आणि राजस्थानने कोलकात्याचा पराभव केला, तर मुंबई 14 पॉईंट्सवर राहिल आणि राजस्थान आणि कोलकात्याचे 12 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये मुंबई प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते.

First published:

Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians, Rajasthan Royals