मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, KKR vs RR : राजस्थान विजयाच्या मार्गावर, KKRची हाराकिरी सुरूच

IPL 2021, KKR vs RR : राजस्थान विजयाच्या मार्गावर, KKRची हाराकिरी सुरूच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयाच्या मार्गावर आलं आहे, तर कोलकात्याची हाराकिरी सुरूच आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने कोलकात्याचा (KKR vs Rajasthan Royals) 6 विकेटने पराभव केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयाच्या मार्गावर आलं आहे, तर कोलकात्याची हाराकिरी सुरूच आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने कोलकात्याचा (KKR vs Rajasthan Royals) 6 विकेटने पराभव केला. कोलकात्याने दिलेलं 134 रनचं आव्हान राजस्थानने 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार संजू सॅमसन 42 रनवर आणि डेव्हिड मिलर 24 रनवर नाबाद राहिले. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर प्रसिद्ध कृषणा आणि शिवम मावीला 1-1 विकेट मिळाली.

या विजयासह राजस्थान रॉयल्सच्या खात्यात 4 पॉईंट्स झाले आहेत, तर कोलकाता अजून 2 पॉईंट्सवरच आहे. 5 सामन्यांमध्ये 2 विजय आणि 3 पराभवांसह राजस्थान सातव्या क्रमांकावर आहे, तर कोलकात्याने 5 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे, त्यामुळे ते शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहेत.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) कोलकात्याच्या (KKR) बॅटिंग पुढची संकट संपता संपत नाहीयेत. राजस्थानविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बॅट्समनला मदत करणाऱ्या खेळपट्टीवरही कोलकात्याचे खेळाडू अपयशी ठरले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून कोलकात्याला पहिले बॅटिंगला पाठवलं, यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 133 रनच करता आले. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 36 रन तर नितीश राणाने 22 रन आणि दिनेश कार्तिकने 25 रन केले. राजस्थानकडून क्रिस मॉरिसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आणि जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्तफिजूर रहमानला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, KKR, Rajasthan Royals