मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 'कोणी खेळाडू देता का खेळाडू?' या टीमने दुसऱ्या फ्रॅन्चायजींकडे उधारीवर मागितले क्रिकेटपटू

IPL 2021 : 'कोणी खेळाडू देता का खेळाडू?' या टीमने दुसऱ्या फ्रॅन्चायजींकडे उधारीवर मागितले क्रिकेटपटू

कोरोनाच्या (Corona Virus) संकटात होत असलेल्या आयपीएलमुळे (IPL 2021) घाबरून काही क्रिकेटपटूंनी मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि एन्ड्रयू टायचा (Andrew Tye) समावेश आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे (RCB) एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनीही माघार घेतली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 26 एप्रिल : कोरोनाच्या (Corona Virus) संकटात होत असलेल्या आयपीएलमुळे (IPL 2021) घाबरून काही क्रिकेटपटूंनी मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि एन्ड्रयू टायचा (Andrew Tye) समावेश आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे (RCB) एडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनीही माघार घेतली आहे, पण याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्सला बसला आहे, कारण मोसमातून त्यांचे 4 परदेशी खेळाडू आताच बाहेर झाले आहेत. राजस्थानच्या टीमकडे आता 4 परदेशी खेळाडूच उरले आहेत, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या राजस्थानने इतर टीमकडे कर्जावर खेळाडू मागितले आहेत.

राजस्थानचे ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson) नेतृत्व करत असलेल्या या टीममध्ये आता जॉस बटलर (Jos Buttler), क्रिस मॉरिस (Chris Morris), डेव्हिड मिलर (David Miller) आणि मुस्तफिझूर रहमान (Mustafizur Rahaman) हे चार परदेशी खेळाडूच उरले आहेत.

राजस्थान टीमशी जोडल्या गेलेल्या एका सूत्राने पीटीआयशी संवाद साधला, तेव्हा आम्ही इतर टीमकडून उधारीवर खेळाडू घ्यायचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. यासाठी राजस्थान टीमने वेगवेगळ्या फ्रॅन्चायजींना पत्रही लिहिलं आहे, पण यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

आयपीएलच्या नियमांनुसार 20 वी मॅच संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोन विन्डो उघडते. 56 मॅच संपेपर्यंत म्हणजेच लीग स्टेज पूर्ण होईपर्यंत टीम त्यांच्या खेळाडूंना उधारीवर दुसऱ्या टीमला देऊ शकतात. या मोसमातली 20 वी मॅच दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात रविवारी झाली आहे.

एखादी टीम दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूलाच लोनवर दुसऱ्या टीमला देऊ शकते. प्रत्येक फ्रॅन्चायजीला एका मोसमात जास्तीत जास्त 3 खेळाडू लोनवर देता येतात, तसंच कोणत्याही खेळाडूला एकपेक्षा जास्तवेळा लोनवर ट्रान्सफर करता येत नाही. यासाठी लोनवर देण्यात येणाऱ्या खेळाडूचीही मंजुरी गरजेची असते, तसंच तो खेळाडू आपल्या सुरुवातीच्या टीमविरुद्ध मॅच खेळू शकत नाही.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानने फक्त 2 मॅच जिंकल्या आहेत, तर 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम 4 पॉइंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021, Rajasthan Royals