IPL 2021 : वरुणच्या 'मिस्ट्री'मध्ये फसला विराट, राहुलने पकडला भन्नाट कॅच, VIDEO

IPL 2021 : वरुणच्या 'मिस्ट्री'मध्ये फसला विराट, राहुलने पकडला भन्नाट कॅच, VIDEO

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) विराट कोहलीचा (Virat Kohli) संघर्ष अजूनही सुरूच आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

  • Share this:

मुंबई, 18 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) विराट कोहलीचा (Virat Kohli) संघर्ष अजूनही सुरूच आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर तो देवदत्त पडिक्कलसोबत (Devdutt Padikkal) ओपनिंगला आला, पण विराट मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरला आऊट झाला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) विराट कोहलीची विकेट घेतली असली, तरी राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) पाठी मागे धावत जाऊन भन्नाट कॅच पकडला.

फक्त दोन फिल्डर 30 यार्डाच्या बाहेर असल्यामुळे विराटने वरुण चक्रवर्तीचा बॉल कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, पण त्रिपाठीने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी अफलातून कामगिरी केली. 6 बॉलमध्ये 5 रन करुन विराट आऊट झाला.

विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला रजत पाटीदारही फक्त 1 रन करुन आऊट झाला. पण ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या फटकेबाजीमुळे बँगलोरने कोलकात्याला 205 रनचं आव्हान दिलं. एबी डिव्हिलियर्सने 34 बॉलमध्ये नाबाद 76 रन आणि ग्लेन मॅक्सवेलने 49 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली. एबीने 9 फोर आणि 3 सिक्स आणि मॅक्सवेलनेही 9 फोर आणि 3 सिक्स लगावल्या.

बँगलोरने या सामन्यात फक्त 3 परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. या मोसमात 3 परदेशी खेळाडूंना घेऊन खेळणारी बँगलोर पहिलीच टीम ठरली आहे. आजच्या सामन्यात त्यांनी डॅनियल ख्रिश्चनऐवजी रजत पाटीदार याला संधी दिली. तर दुसरीकडे कोलकात्याने मुंबईविरुद्ध पराभव झालेली टीमच कायम ठेवली.

Published by: Shreyas
First published: April 18, 2021, 7:02 PM IST

ताज्या बातम्या