मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 'नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राहुल', जाफरने शेयर केलं हेरा-फेरीचं भन्नाट Meme

IPL 2021 : 'नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राहुल', जाफरने शेयर केलं हेरा-फेरीचं भन्नाट Meme

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) पहिल्यांदाच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सामना होत आहे.  या मॅचआधी पंजाबचा बॅटिंग प्रशिक्षक वसीम जाफर (Wasim Jaffer) याचं केएल राहुल (KL Rahul) बद्दलचं भन्नाट ट्वीट व्हायरल झालं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 26 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) पहिल्यांदाच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सामना होत आहे. पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Punjab Kings vs KKR) यांच्यात ही मॅच होत आहे. या मॅचआधी पंजाबचा बॅटिंग प्रशिक्षक वसीम जाफर (Wasim Jaffer) याचं भन्नाट ट्वीट व्हायरल झालं आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राहुल आज रात्री पुन्हा खेळणार, असं ट्वीट वसीम जाफरने केलं. या ट्वीटसोबत जाफरने हेरा-फेरी चित्रपटाचा एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये सुनिल शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल आहेत. 'मेरेको ऐसा धक धक होरेला है,' असं कॅप्शन जाफरने या फोटोला दिलं आहे.

याआधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सीरिज झाली होती, या सीरिजमध्ये केएल राहुलने (KL Rahul) निराशाजनक कामगिरी केली होती. सीरिजच्या पाचही मॅच याच मैदानात झाल्या होत्या, तेव्हा राहुलने 1, 0, 0,14 अशा एकूण 15 रन केल्या होत्या, तर शेवटच्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली नव्हती. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही राहुलच्या पदरी निराशा आली. 20 बॉलमध्ये 19 रन करून राहुल आऊट झाला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाबने 5 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय झाला तर 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याविरुद्ध त्यांचा विजय झाला, तर ते मुंबई इंडियन्सना मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहोचतील.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Kl rahul