मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : द्रविडने केलं होतं मजबूत 'मार' खाल्लेल्या खेळाडूचं कौतुक, आता आयपीएल खेळणार!

IPL 2021 : द्रविडने केलं होतं मजबूत 'मार' खाल्लेल्या खेळाडूचं कौतुक, आता आयपीएल खेळणार!

द्रविडने कौतुक केलेल्या खेळाडूला आयपीएलमध्ये संधी

द्रविडने कौतुक केलेल्या खेळाडूला आयपीएलमध्ये संधी

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्रासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) टीममध्ये मोठे बदल केले आहेत. आरसीबीने श्रीलंकेचे 2 आणि सिंगापूरच्या एका खेळाडूला संधी दिली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 22 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्रासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) टीममध्ये मोठे बदल केले आहेत. आरसीबीने श्रीलंकेचे 2 आणि सिंगापूरच्या एका खेळाडूला संधी दिली आहे. सिंगापूरचा ऑलराऊंडर टीम डेव्हिड (Tim David), श्रीलंकेचा ऑलराऊंडर वानिंदु हसारंगा (Wanindu Hasaranga), फास्ट बॉलर दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) आरसीबीकडून खेळणार आहेत. दुष्मंता चमीराने भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs Sri Lanka) चांगली कामगिरी केली होती, पण वनडे सीरिजमध्ये तो फ्लॉप ठरला होता. दुष्मंता चमीरा अपयशी ठरत होता तेव्हा राहुल द्रविडने (Rahul Dravid) चमीराचा आत्मविश्वास वाढवला होता, तसंच तो उत्कृष्ट बॉलर असल्याचंही द्रविड म्हणाला होता.

श्रीलंकेचा क्रीडा पत्रकार रेक्स क्लेमेनटाईन यांनी दावा केला होता की, दुसऱ्या वनडेनंतर राहुल द्रविडने श्रीलंकेच्या टीम मॅनेजमेंटसोबत चर्चा केली होती. त्यावेळी द्रविड चमीराच्या कामगिरीवर प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. त्याआधी चमीराला दोन मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती, तसंच त्याने तब्बल 107 रन दिल्या होत्या. असं असलं तरी द्रविडला चमीराच्या बॉलिंगमध्ये प्रतिभा दिसली.

भारताविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये चमीराने धमाकेदार पुनरागमन केलं आणि 4 विकेट घेतल्या. यानंतर आरसीबीने त्याला टीममध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. 29 वर्षांच्या चमीराने श्रीलंकेकडून 28 टी-20 मॅचमध्ये 30 विकेट घेतल्या. याशिवाय वनडेमध्ये त्याला 35 आणि 32 विकेट मिळाल्या आहेत.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राआधी आरसीबीचा मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच (Simon Katich) यानेही राजीनामा दिला आहे. तर एडम झम्पा, केन रिचर्डसन आणि डॅनियल सॅम्स उरलेल्या आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीत.

First published:

Tags: IPL 2021, RCB